उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

"आपला तिरंगा आपला अभिमान दर्शवतो" - उपराष्ट्रपती


'हर घर तिरंगा' मोटारसायकल रॅलीला उपराष्ट्रपतींनी खासदारांसह दाखवला हिरवा झेंडा

अशा कार्यक्रमांमुळे संसदेतील कलह कमी होईल - उपराष्ट्रपती

2047 पर्यंत भारताला जगात अव्वल स्थानी पोहोचवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

वसाहतवादी सरकारने बंदी घातलेल्या कवितेचे उपराष्ट्रपतींनी केले वाचन

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2023 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023

"आपला  तिरंगा आपला अभिमान आहे " असे सांगत  उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज नवी दिल्लीतली प्रगती मैदान  येथून 'हर घर तिरंगा' मोटारसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.संस्कृती  मंत्रालयाने आयोजित केलेल्या या अनोख्या मोटारसायकल  रॅलीमध्ये अनेक संसद सदस्य आणि केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते.

सहभागी संसद सदस्यांच्या उत्साहाचे आणि आनंदाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे संसदेतील कलह कमी होईल अशी आशा उपराष्ट्रपतींनी  व्यक्त केली.

या कार्यक्रमाला  संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी सर्वांना अभिमान वाटावा असे  भारतीय होण्याचे आणि नेहमी राष्ट्राला प्रथम ठेवण्याचे आवाहन केले. भारताने प्रत्येक आघाडीवर केलेल्या भरीव प्रगतीचा उल्लेख करून धनखड म्हणाले की, 2047 मध्ये, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा तो जागतिक स्तरावर अव्वल असेल अशाप्रकारे या दिशेने आपण आपल्या तरुणांसाठी  कार्य केले पाहिजे आणि मार्गदर्शन केले पाहिजे.

आजचा दिवस हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि संस्थापकांच्या बलिदानाचा आणि योगदानाचा गौरव करण्याचा आणि स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे, हे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.  प्रत्येक भारतीयाने आपल्या राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज उंच फडकत राहील हे सुनिश्चित  करण्याचे आवाहन त्यांनी  केले.

'हर घर तिरंगा' मोहीम आणि मोटारसायकल रॅलीचे   यशस्वीरीत्या आयोजन  केल्याबद्दल संस्कृती  मंत्रालयाच्या प्रयत्नांचेही उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री  पियूष गोयल, ईशान्य क्षेत्र विकास  आणि सांस्कृतिक, पर्यटन मंत्री  जी.  किशन रेड्डी, माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री   अनुराग सिंह ठाकूर, जलशक्ती मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत, संस्कृती  राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, खासदार आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

उपराष्ट्रपतींच्या भाषणाचा संपूर्ण मजकूर वाचण्यासाठी देण्यात आलेल्या खालील दुव्यावर  कृपया खाली क्लिक करा

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1947647

 

  

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1947774) आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Punjabi , Kannada , Urdu , Tamil