विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
तंत्रज्ञान विकास मंडळ-विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (टीडीबी-डीएसटी) महाराष्ट्रातील मेसर्स नोकार्क रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेडला दिले पाठबळ; डिजिटली -सक्षम प्रगत वैश्विक आयसीयू व्हेंटिलेटरचे कंपनी करणार व्यावसायिक तत्वावर उत्पादन
Posted On:
09 AUG 2023 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2023
अशा देशात जिथे 85% पेक्षा जास्त वैद्यकीय उपकरणे आयात केली जातात, तिथे स्वदेशी विकसित उत्पादनांबाबत कधीही जास्त गांभीर्याने पाहिले गेले नाही. केन्द्र सरकार, आपल्या "मेक इन इंडिया" उपक्रमांतर्गत, आरोग्यसेवेसह सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटलीकरणाच्या नूतनीकरणावर लक्ष केंद्रित करून, देशांतर्गत नवोन्मेषासाठी एक मजबूत परिसंस्था राबवत आहे.
तंत्रज्ञान विकास मंडळाने (टीडीबी) या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना अनुसरुन, महाराष्ट्रातील मेसर्स नोकार्क रोबोटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत करार केला आहे. डिजिटली सक्षम प्रगत वैश्विक आयसीयू व्हेंटिलेटरच्या व्यापारीकरणासाठी ती समर्पित आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 7.89 कोटी आहे. त्यापैकी 3.94 कोटींचे पाठबळ मंडळ देणार आहे. कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील स्टार्टअप इनक्यूबेशन आणि इनोव्हेशन सेंटरमध्ये स्थापित मेसर्स नोकार्क, आपल्या स्वदेशी विकसित तंत्रज्ञानासह नवोन्मेषाचे प्रतीक आहे.

व्हेंटिलेटरच्या प्रत्येक घटकासाठी अनेक पेटंट दाखल करून नोकार्कने संपूर्ण तंत्रज्ञान स्वदेशात विकसित केले आहे. कंपनीच्या एंट्री-लेव्हल व्हेंटिलेटर, V310 ने कोविड-19 महामारीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतातील विविध रुग्णालयांमध्ये ते बसवले होते. या जीवनरक्षक प्रणालीने अनेक प्राण वाचवले. या यशाच्या बळावर, नोकार्क आता नोकार्क V730i बाजारात आणत आहे. हे एक स्मार्ट व्हेंटिलेटर आहे. V730i व्हेंटीलेटर GSM, Wi-Fi आणि LAN द्वारे क्लाउडबरोबर अखंड संपर्क व्यवस्था उपलब्ध करते. यामुळे डॉक्टर आणि अतिदक्षता तज्ञ नोकार्कच्या डिजिटल मंचावर दुरुनही रुग्णांची माहिती तपासू शकतात. रुग्णालयांना त्यांची आयसीयू माहिती/आकडेवारीचे डिजिटलीकरण करता येते. हा उपक्रम वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचा भाग आहे.
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1947146)
Visitor Counter : 170