युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अतिशय गरिबीत राहणाऱ्या असामान्य क्रीडापटूंना पंडीत दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून 5 लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य देण्यात आले- केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर

Posted On: 08 AUG 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय सध्या अतिशय गरिबीत राहात असलेल्या असामान्य क्रीडापटूंना योग्य प्रकारे मदत देण्यासाठी, स्पर्धेसाठी तयारी करताना तसेच स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या असामान्य क्रीडापटूंना त्यांच्या दुखापतीच्या स्वरुपानुसार वैद्यकीय उपचारांकरिता योग्य प्रकारे मदत देण्यासाठी, क्रीडापटूंच्या कल्याणाला प्रोत्साहन म्हणून विशेषतः त्यांच्यातील आणि गरिबीत त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांमधील वैफल्याची भावना दूर करण्यासाठी योग्य प्रकारची मदत म्हणून आणि गरिबीत राहात असलेल्या क्रीडापटूंना प्रशिक्षण, क्रीडासामग्रीची खरेदी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य प्रकारची मदत म्हणून पंडीत दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी योजनेची अंमलबजावणी करते. गेल्या पाच वर्षात या निधीमधून राज्यनिहाय आणि क्रीडा प्रकारानुसार मदत देण्यात आलेल्या क्रीडापटूंची माहिती विभागाच्या https://yas.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अतिशय गरिबीत राहणाऱ्या असामान्य क्रीडापटूंना 5 लाख रुपयांपर्यंतची आणि क्रीडापटू किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतची मदत पंडीत दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी योजने अंतर्गत देण्यात आली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

 

 

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946873) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Tamil , Kannada