पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान

Posted On: 08 AUG 2023 5:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023

पंचायती राज संस्थांमधील (पीआरआयएस) निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या क्षमता निर्मितीसाठी आर्थिक वर्ष 2022-23 ते 2025-26 या कालावधीतील अंमलबजावणीसाठी केंद्र पुरस्कृत सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाला (आरजीएसए) मंजुरी देण्यात आली आहे. पंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शाश्वत विकास ध्येयांच्या पूर्तीसाठी पंचायतींची प्रशासकीय क्षमता विकसित करणे हे या सुधारित आरजीएसएचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बैठका, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परिषदा, पीएफएमएस इत्यादींच्या माध्यमातून राज्यांकडून होणाऱ्या निधीच्या वापरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, या योजनेअंतर्गत राज्य सरकारे  तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचे वास्तव स्वरूपातील परीक्षण करण्यासाठी प्रशिक्षण व्यवस्थापन पोर्टल (टीएमपी)ची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. निधीचा गैरवापर झाल्याच्या कोणत्याही घटनेचा अहवाल मंत्रालयाला प्राप्त झालेला नाही.  सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत जारी करण्यात आलेल्या निधीचा राज्यनिहाय तपशील खाली दिला आहे.

या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून 37.84 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

(रक्कम कोटी रुपयांमध्ये )

State/UT-wise Funds Released under revamped Rashtriya Gram Swaraj Abhiyan (RGSA)(2022-23)

 

 

Fund Released

 

Sl. No.

State/ UT

2022-23

1

Andaman & Nicobar Islands

0.00

2

Andhra Pradesh

0.00

3

Arunachal Pradesh

108.69

4

Assam

55.29

5

Bihar

33.37

6

Chhattisgarh

0.00

7

Dadra & Nagar Haveli

1.14

Daman & Diu

8

Goa

0.00

9

Gujarat

0.00

10

Haryana

0.00

11

Himachal Pradesh

60.65

12

Jammu & Kashmir

40.00

13

Jharkhand

0.00

14

Karnataka

36.00

15

Kerala

30.40

16

Ladakh

0.00

17

Lakshadweep

0.00

18

Madhya Pradesh

28.00

19

Maharashtra

37.84

20

Manipur

8.63

21

Meghalaya

0.00

22

Mizoram

14.27

23

Nagaland

0.00

24

Odisha

11.40

25

Puducherry

0.00

26

Punjab

34.25

27

Rajasthan

0.00

28

Sikkim

6.01

29

Tamil Nadu

25.42

30

Telangana

0.00

31

Tripura

9.80

32

Uttar Pradesh

85.05

33

Uttarakhand

42.48

34

West Bengal

4.28

 पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 1946708) Visitor Counter : 230


Read this release in: English , Urdu , Manipuri