आदिवासी विकास मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाने देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने वैद्यकीय आणि निरामय पर्यटनाकरिता तयार केले राष्ट्रीय धोरण आणि आराखडा
Posted On:
07 AUG 2023 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2023
देशातील वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने वैद्यकीय आणि निरामय पर्यटनासाठी राष्ट्रीय धोरण आणि आराखडा तयार केला आहे. या धोरणाचे प्रमुख आधारस्तंभ खालीलप्रमाणे आहेत:
- निरामयतेचे स्थान म्हणून भारतासाठी ब्रँड विकसित करणे.
- वैद्यकीय आणि निरामय पर्यटनासाठी परिसंस्था मजबूत करणे
- ऑनलाइन मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल (MVT) पोर्टलची निर्मिती करून डिजिटलायझेशन सक्षम करणे
- वैद्यकीय मूल्याच्या प्रवासासाठी सुलभता वाढवणे
- निरामय पर्यटनाला प्रोत्साहन देणे
- प्रशासन आणि संस्थात्मक चौकट
पर्यटन मंत्रालय आपल्या नेहमीच्या कार्याचा एक भाग म्हणून "अतुल्य भारत" या ब्रीद वाक्यानुसार देशातील विविध पर्यटन स्थळे आणि देशातील उत्पादनांना चालना देण्यासाठी परदेशातील महत्त्वाच्या आणि संभाव्य बाजारपेठांमध्ये जागतिक मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन माध्यम मोहिमांचे आयोजन करते. तसेच मंत्रालयाच्या समाज माध्यम खात्याच्या माध्यमातून वैद्यकीय पर्यटन या संकल्पनेसह विविध संकल्पनांच्या डिजिटल जाहिराती देखील नियमितपणे केल्या जातात.
भारत सरकारने 30.11.2016 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार ई-टुरिस्ट व्हिसा योजनेचे उदारीकरण केले आणि ई-टूरिस्ट व्हिसा (ईटीव्ही) योजनेचे नाव बदलून ई-व्हिसा योजना असे करण्यात आले आणि सध्या त्यात ई-मेडिकल व्हिसा आणि ई-मेडिकल अटेंडंट व्हिसा अशा ई-व्हिसाच्या उप-श्रेणी आहेत.
ई-मेडिकल व्हिसाच्या बाबतीत आणि ई-मेडिकल अटेंडंट व्हिसासाठी, तिहेरी प्रवेशाची परवानगी आहे आणि परदेशी क्षेत्रीय नोंदणी अधिकारी (एफआरआरओ)/परदेशी नोंदणी अधिकारी (एफआरओ) यांच्याकडून प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते.
याशिवाय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, देशातील वैद्यकीय मूल्याच्या प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी इतर मंत्रालये तसेच रुग्णालये, एमव्हीटी सुविधा प्रदाते, विमा कंपन्या, सुविधा प्रदाते आणि एनएबीएच इत्यादी हितधारकांशी समन्वय साधत आहे.
संस्कृती, पर्यटन आणि ईशान्येकडील क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1946556)
Visitor Counter : 206