विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

ब्रिक्स समूहाने ज्ञान, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वाधिक लोकसंख्या असलेली बाजारपेठ म्हणून जागतिक महत्त्व कायम ठेवले पाहिजे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोक्रम (एसटीआय) प्राधान्यक्रम आणि धोरण अद्ययावतीकरण या संकल्पनेबद्दल दक्षिण आफ्रिकेत गोएबरहा येथे अकराव्या ब्रिक्स एसटीआय मंत्रिस्तरीय बैठकीत जितेंद्र सिंह यांनी केले दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन

Posted On: 05 AUG 2023 4:42PM by PIB Mumbai

 

ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) समूहाने ज्ञान, सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वाधिक लोकसंख्या असलेली बाजारपेठ म्हणून जागतिक महत्त्व कायम ठेवले पाहिजे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोक्रम (एसटीआय) प्राधान्यक्रम आणि धोरण अद्ययावतीकरण या संकल्पनेबद्दल दक्षिण आफ्रिकेत गोएबरहा शहरात सुरू असलेल्या अकराव्या ब्रिक्स एसटीआय मंत्रिस्तरीय बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रादेशिक वैज्ञानिक संशोधन आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स समूह स्थानिक अर्थव्यवस्थांसाठी योग्य ठरतील अशा संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उपाययोजनांच्या माध्यमातून सहयोग देऊ शकेल असे त्यांनी सांगितले

शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि सर्वांसाठी जागतिक सार्वजनिक वस्तू परवडणाऱ्या आणि समान प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य, कृषी, जल, सागरी विज्ञान, अक्षय ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, प्रगत डिजिटल तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासारख्या क्षेत्रांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवण्यासाठी डिजिटल आणि तंत्रज्ञान साधनांसह नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक उपाय विकसित करण्यासाठी भारत ब्रिक्सच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात ब्रिक्स सहकार्य वाढवण्यासाठी भारत बारकाईने काम करण्यास उत्सुक आहे, असे त्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर संशोधन आणि नवकल्पना क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधानया मंत्रावर भर देत भारत सातत्याने प्रगती करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वैज्ञानिक संशोधनाला निधीचे न्याय्य वाटप केले जाईल आणि अधिकाधिक खाजगी सहभाग असेल याची ग्वाही मोदी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (एनआरएफ) देईल, यासाठी कंपन्यांना संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक करण्यास एनआरएफला भाग पाडावे लागेल. "आम्ही एका  वेगळ्या सार्वजनिक खाजगी भागीदारी संस्थेच्या स्थापनेची योजना आखत आहोत. उद्योगांचा सहभाग वाढवण्यासाठी 36,000 कोटी रूपये संशोधन निधी खाजगी क्षेत्रातून येणार आहे तर सरकार त्यासाठी  14,000 कोटी रूपये देणार आहे"अशी माहिती त्यांनी दिली.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1946092) Visitor Counter : 87


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil