कायदा आणि न्याय मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरदृश्य प्रणालीमार्फत काम करणारी न्यायालये

Posted On: 04 AUG 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

 

'दूरदृश्य प्रणालीमार्फत काम करणारे न्यायालय' या संकल्पनेचा उद्देश न्यायालयात वादी किंवा वकिलाची उपस्थिती अनिवार्य न ठेवता या प्रणालीमार्फत खटल्यांचा निकाल देणे हा आहे. न्यायालयीन संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करता यावा तसेच वादींना क्षुल्लक विवादांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.न्यायाधीश, आभासी इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर  हे आभासी न्यायालय चालवू शकतात.  तसेच हे न्यायालय 24X7 कार्य करू शकते आणि या न्यायालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात विस्तारलेले असू शकते. सध्या, ही न्यायालये केवळ वाहतूक चालान संबंधित प्रकरणे हाताळत आहेत. यामुळे केवळ खटल्यांचा खर्च कमी झाला नाही तर वाहतूक चालान प्रकरणे सोडवण्याची प्रक्रिया देखील सुलभ झाली आहे. 30.06.2023 पर्यंत 22 आभासी न्यायालयांद्वारे 3.26 कोटींहून अधिक प्रकरणे (3,26,14,617) हाताळण्यात आली आहेत आणि 39 लाखांहून अधिक (39,16,405) प्रकरणांमध्ये 419.89 कोटी रुपयांहून अधिक ऑनलाइन दंड वसूल करण्यात आला आहे.  

आभासी न्यायालयांद्वारे हाताळल्या जाणाऱ्या संपूर्ण भारतातील खटल्यांची तपशीलवार माहिती परिशिष्ट- I मध्ये दिलेली आहे. 

30.06.2023 पर्यंत 18 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशी 22 न्यायालये कार्यरत आहेत-  दिल्ली (2), हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ (2), महाराष्ट्र (2), आसाम, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर (2), उत्तर प्रदेश, ओडिशा, मेघालय, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि राजस्थान. 

परिशिष्ट I

देशभरातील आभासी न्यायालयांद्वारे हाताळल्या जाणार्‍या खटल्यांचे तपशीलवार विभाजन खालीलप्रमाणे आहेः 

StatisticsofVirtualCourts-30.06.2023

S.No

Establishment_Name

Received

Proceeding Done

Contested

Paid Challans

Challan Amount

1

ASSAM TRAFFIC DEPARTMENT

72415

72413

357

19022

13159081

2

CHHATTISGARH TRAFFIC DEPARTMENT

101

87

0

37

81500

3

GUJARAT TRAFFIC DEPARTMENT

126716

74647

82

2718

171300

4

HARYANA TRAFFIC DEPARTMENT

821765

681342

1080

16992

12638701

5

HIMACHAL PRADESH TRAFFIC DEPARTMENT

81631

57247

86

1954

4011753

6

JAMMU TRAFFIC DEPARTMENT

157590

136152

880

38613

21420590

7

KARNATAKA TRAFFIC DEPARTMENT

47857

47824

119

40576

338437490

8

KASHMIR TRAFFIC DEPARTMENT

356434

356433

9300

75231

41025995

9

KERALA(POLICE DEPARTMENT)

635792

625069

1280

54717

28393893

10

KERALA TRANSPORT DEPARTMENT

485190

476054

2971

79969

115151882

11

MADHYA PRADESH TRAFFIC DEPARTMENT

46581

36028

57

1853

1315300

12

MAHARASHTRA TRANSPORT DEPARTMENT

40387

24349

20

1449

2348605

13

MEGHALAYA TRAFFIC DEPARTMENT

437

314

0

33

20000

14

NOTICE BRANCH DELHI TRAFFIC DEPARTMENT

14133187

13712402

77223

1344606

954951505

15

Odisha Traffic CTC-BBSR COMMISSIONERATE

333416

307908

627

20615

19894001

16

PUNE TRAFFIC DEPARTMENT

6080

6056

18

591

114250

17

RAJASTHAN TRAFFIC DEPARTMENT

26497

23650

892

9708

6276170

18

TAMIL NADU TRAFFIC DEPARTMENT

162337

143042

1333

78188

718829890

19

TRIPURA TRAFFIC DEPARTMENT

354

353

1

4

2900

20

UTTAR PRADESH TRAFFIC DEPARTMENT

10238520

7569945

28769

501614

298422756

21

VIRTUAL COURT DELHI(TRAFFIC)

4773216

4734431

105500

1624555

1618662492

22

WEST BENGAL TRAFFIC DEPARTMENT

67940

64293

76

3360

2039452

Total

32614443

29150039

230671

3916405

4198908506

 

ही माहिती कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1945899) Visitor Counter : 93


Read this release in: English , Urdu , Telugu