अणुऊर्जा विभाग
स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर्स (SMRs) चा स्वदेशात विकास करण्यासाठी इतर देशांसोबत सहकार्य करण्याच्या शक्यतांची चाचपणी सुरू असल्याची केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती
देशात एसएमआर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्रे आणि स्टार्ट अप्सच्या सहभागाला अनुमती देण्याच्या दृष्टीने, अणुऊर्जा कायदा 1962 च्या तरतुदींचा अभ्यास सुरू: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
02 AUG 2023 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023
स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स (SMRs) म्हणजेच अत्याधुनिक लघु अणुभट्ट्यांचा स्वदेशात विकास करण्यासाठी इतर देशांसोबत सहकार्य तसेच पर्यायांची केंद्र सरकार चाचपणी करत आहे, अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिली.
सरकारच्या निर्णयाच्या आधारे भविष्यातील कृती निश्चित केली जाईल, असे लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले. देशात SMRs तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी खाजगी क्षेत्र आणि स्टार्टअप्सना सहभागी होण्यासाठी अणुऊर्जा कायदा, 1962 मधील तरतुदी तपासल्या जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
औद्योगिक क्षेत्रातील, कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने, विशेषतः जिथे विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठ्याची गरज आहे, अशा ठिकाणी, स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर्स हे एक आश्वासक तंत्रज्ञान ठरू शकेल, असे डॉ. सिंह यांनी म्हटले आहे. स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी, भारत एसएमआरच्या विकासासाठी पावले उचलण्याचा विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अशा अत्याधुनिक अणुभट्ट्यांची उभारणी करण्यातली व्यवहार्यता आणि परिणामकारकता अभ्यासण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यासाठी सविस्तर तांत्रिक चर्चा सध्या सुरू आहे. मोठ्या आकाराच्या अणुभट्ट्यांच्या माध्यमातून अणुऊर्जा क्षमता वाढवणे हे विभागाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी संगितले.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945176)
Visitor Counter : 137