पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलाद मंत्रालयाने राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार-2023 साठी उद्योग आणि संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकडून मागवले अर्ज

Posted On: 02 AUG 2023 2:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023

केंद्र सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या वतीने  परिचालन, संशोधन आणि विकास, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा संवर्धन आदींचा समावेश असलेल्या धातुकर्म क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार प्रदान केले जातात. धातूशास्त्रज्ञ पुरस्कार-2023 साठी उद्योग आणि संशोधन तसेच  शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार योजनेचे उद्दिष्ट

उत्पादन, संशोधन, रचना, शिक्षण, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन यामध्ये लोह आणि पोलाद क्षेत्रांमधील धातूशास्त्रज्ञांनी दिलेले उल्लेखनीय योगदान आणि आत्मनिर्भर भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचा गौरव करणे हा राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार योजनेचा उद्देश आहे.

खालील चार श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातील:-

  1. जीवनगौरव पुरस्कार
  2. राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार
  3. युवा धातूशास्त्रज्ञ पुरस्कार
  1. पर्यावरण
  2. धातू विज्ञान
  1. लोह आणि पोलाद क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी पुरस्कार

नामांकन पद्धती

https://awards.steel.gov.in या वेब पोर्टलद्वारे 07/08/2023 पासून केवळ ऑनलाइन  माध्यमातून अर्ज स्वीकारले जातील. अर्ज स्वीकरण्याची शेवटची तारीख 06/09/2023 असून  संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

राष्ट्रीय धातूशास्त्रज्ञ पुरस्कार संबंधी पात्रता निकष आणि इतर अटी व शर्तींसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे देखील वर नमूद केलेल्या वेबसाइट लिंकवर उपलब्ध आहेत.

ही योजना केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे ज्यांनी उद्योग, संशोधन आणि विकास किंवा शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याद्वारे भारतात धातू शास्त्र क्षेत्रात योगदान दिले आहे. उमेदवाराची पात्रता 01/01/2023 पासून विचारात घेतली जाईल.

 

  

 

 

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1944967) Visitor Counter : 112


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu