कोळसा मंत्रालय
व्यावसायिक लिलावाच्या 7व्या फेरीच्या पहिल्या दिवशी दोन कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध
एकूण भूगर्भीय साठा 516.34 दशलक्ष टन
अपेक्षित भांडवली गुंतवणूक 450 कोटी रुपये
Posted On:
01 AUG 2023 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023
कोळसा मंत्रालयाने 29 मार्च 2023 रोजी 7 व्या फेरी अंतर्गत आणि 6 व्या फेरीच्या दुसऱ्या प्रयत्नांतर्गत कोळसा खाणींचा लिलाव सुरू केला होता. बोलींचे मूल्यांकन केल्यानंतर, 01.08.2023 पासून सहा खाणींसाठी फॉरवर्ड ई-लिलाव सुरू करण्यात आले.
पहिल्या दिवशी, सीएमएसपी कोळसा खाण आणि एमएमडीआर कोळसा खाण अशा दोन कोळसा खाणी लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. खाणींचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: -
- एक कोळसा खाण पूर्णतः तर दुसरी अंशतः उपलब्ध आहे.
- या दोन खाणींमधील एकूण भूगर्भीय साठा 516.34 दशलक्ष टन (MT) आहे.
- या कोळसा खाणींसाठी एकत्रित सर्वोत्तम उत्पादन क्षमता (पीआरसी) 3 दशलक्ष टन प्रतिवर्ष (एमटीपीए) आहे.
पहिल्या दिवसाचा निकाल खालीलप्रमाणे आहे.
Sl. No.
|
Name of the Mine
|
State
|
PRC (MTPA)
|
Geological
Reserves (MT)
|
Closing Bid Submitted by
|
Reserve Price (%)
|
Final Offer (%)
|
1
|
North Dhadu
(Western Part)
|
Jharkhand
|
3.00
|
434.65
|
NLC India Limited
|
4.00
|
6.00
|
2
|
Pathora West
|
Madhya Pradesh
|
NA
|
81.69
|
Shri Bajrang Power and Ispat Limited
|
4.00
|
18.25
|
उत्खनन सुरू झाल्यावर, या कोळसा खाणींच्या सर्वोच्च उत्पादन क्षमतेनुसार (अंशतः उपलब्ध कोळसा खाणी वगळून) कोळसा खाणींमधून 337.54 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल निर्माण होईल. या खाणींमध्ये 450 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक आकर्षित होईल आणि 4,056 लोकांना रोजगार मिळेल.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1944832)