अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फेम इंडिया योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी


2,96,885 इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर

Posted On: 01 AUG 2023 4:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

अवजड उद्योग मंत्रालयाने 1 एप्रिल 2019 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10,000 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीचे पाठबळ असलेली भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादनाचा टप्पा II (फेम इंडिया टप्पा II) योजना तयार केली आहे. हा टप्पा प्रामुख्याने सार्वजनिक आणि सामायिक वाहतुकीच्या विद्युतीकरणावर लक्ष केंद्रित करतो आणि 7090 ई-बस, 5 लाख ई-3 चाकी, 55000 ई-4 चाकी प्रवासी गाड्या आणि 10 लाख ई-दुचाकी गाड्यांच्या मागणीला प्रोत्साहन देण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. याशिवाय,या योजनेंतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा उभारणीलाही पाठबळ दिले जाते.

फेम इंडिया योजनेच्या टप्पा-II अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांकडून ग्राहकांना 28.07.2023 पर्यंत (http://fame2.heavyindustries.gov.in/dashboard.aspx नुसार) 4157.00 कोटी रुपये (अंदाजे) किमतीची   8,47,578 वाहने विकली गेली आहेत.विक्री झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकारानुसार तपशील खालीलप्रमाणे आहे:

Sl. No.

Wheeler Type

Total No. of Vehicle

1.

2 wheeler

7,53,140

2.

3 wheeler

85,168

3.

4 wheeler

9,270

Total

8,47,578

तसेच,अवजड उद्योग मंत्रालयाने 65 शहरे/एसटीयू/राज्य सरकारी आस्थापनांना शहरांतर्गत परिचालनासाठी 6315 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत.

ई-वाहन पोर्टल (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) नुसार, राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय कार्यरत इलेक्ट्रिक वाहनांची तपशीलवार यादी परिशिष्टात दिली आहे.

फेम-इंडिया योजना टप्पा -II अंतर्गत, इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना कोणतेही प्रोत्साहन दिले जात नाही. ग्राहकांना (खरेदीदार/अंतिम वापरकर्ते) प्रोत्साहन/सवलत ही हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी किमतीच्या रूपात प्रदान करण्यात आली आहे, ज्याचा व्यापक अंगिकार करण्यासाठी भारत सरकारकडून मूळ वाहन उत्पादकांना (इव्ही  उत्पादकांना) प्रतिपूर्ती केली जाईल.

परिशिष्ट

वाहन4 नुसार 14.07.2023 पर्यंत कार्यरत इलेक्ट्रिक वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे

Sl. No

State name

Till date State wise - total vehicle registered as Electric

1

Andaman & Nicobar Island

186

2

Andhra Pradesh

66,500

3

Arunachal Pradesh

25

4

Assam

1,16,605

5

Bihar

1,55,457

6

Chandigarh

7,628

7

Chhattisgarh

52,813

8

Delhi

2,29,305

9

Goa

12,139

10

Gujarat

1,34,273

11

Haryana

67,812

12

Himachal Pradesh

2,362

13

Jammu and Kashmir

10,225

14

Jharkhand

35,331

15

Karnataka

2,39,948

16

Kerala

94,346

17

Ladakh

65

18

Madhya Pradesh

92,388

19

Maharashtra

2,96,885

20

Manipur

1,198

21

Meghalaya

129

22

Mizoram

114

23

Nagaland

60

24

Odisha

60,097

25

Puducherry

4,421

26

Punjab

34,162

27

Rajasthan

1,75,595

28

Sikkim

20

29

Tamil Nadu

1,67,216

30

Tripura

14,379

31

UT of DNH and DD

345

32

Uttarakhand

48,250

33

Uttar Pradesh

5,56,629

34

West Bengal

67,111

Grand Total

27,44,019

यानुसार महाराष्ट्रातील 2,96,885 गाड्यांची नोंदणी इलेक्ट्रिक वाहन म्हणून झाली आहे.

1- दिलेला तपशील केंद्रीकृत वाहन 4 नुसार डिजिटलाइज्ड वाहन नोंदीसाठी आहे.

2 - तेलंगणा आणि लक्षद्वीपसाठी डेटा प्रदान केलेला नाही कारण ते केंद्रीकृत वाहन 4 मध्ये समाविष्ट नाहीत."

अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1944703) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Telugu