अर्थ मंत्रालय

2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री मुद्रा योजने (पीएमएमवाय) अंतर्गत 6,23,10,598 कर्जे मंजूर

Posted On: 31 JUL 2023 9:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2023

 

नवीन किंवा सध्या सुरू असलेल्या सूक्ष्म उद्योग/व्यवसायाला दहा लाख रूपयांपर्यतचे संस्थात्मक कर्ज उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) उद्दिष्ट आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.  दोन वर्षांत या योजनेखाली मंजूर झालेल्या कर्जांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

F.Y. 2021-22

F.Y. 2022-23

5,37,95,526

6,23,10,598

राज्यनिहाय आणि केंद्रशासित प्रदेशांप्रमाणे माहिती परिशिष्ट -I.

शेड्युल्ड कमर्शियल बँका (एससीबी), बँकेतर वित्तीय कंपन्या (एनबीएपसी) आणि लघु वित्तीय संस्था (एमएफआय) या सभासद कर्ज देणाऱ्या संस्था (एमएल आय) प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रूपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय (विनातारण) देतात. कर्ज घेण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जिच्याकडे लघु उद्योगासाठी व्यवसाय योजना आहे, ती व्यक्ती या योजनेंतर्गत उत्पादन, व्यापार, सेवा क्षेत्रातील उत्पन्न वाढवणार्‍या व्यवहारांसाठी कर्ज घेऊ शकते. तसेच

शेतीशी संबंधित कामांसाठी तीन कर्ज श्रेणींमध्ये कर्ज उपलब्ध होते. त्या तीन श्रेण्या अशा- शिशू ( 50,000 रूपयांपर्यंतचे कर्ज), किशोर (50,000 रूपयांपेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत कर्ज) आणि तरुण (5 लाखांपेक्षा जास्त आणि 10 लाखांपर्यंत कर्ज)

या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील तक्रारी संबंधित बँकांशी सल्लामसलत करून सोडवल्या जातात. सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम (सीपीजीआरएएमएस) वर प्राप्त झालेल्या तक्रारी देखील संबंधित बँकांकडे विहित कालमर्यादेत सोडवण्यासाठी घेतल्या जात आहेत.

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944503) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi