सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधील मधील कौशल्याची कमतरता कमी करणे

Posted On: 31 JUL 2023 4:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जुलै 2023

 

ओडिशासह देशभरातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांमधील कौशल्य वृद्धीसाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. या योजना आणि उपक्रमांमध्ये टूल रूम आणि तांत्रिक संस्था योजना, तंत्रज्ञान केंद्र प्रणाली कार्यक्रम, प्रशिक्षण संस्था योजनांना सहाय्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हब योजना, कॉयर विकास योजना, उद्योजकता कौशल्य विकास योजना, नवोन्मेषाला चालना देण्यासाठीची  योजना, ग्रामीण उद्योग आणि उद्योजकता इत्यादींचा समावेश आहे. त्याअंतर्गत युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आधीच कार्यरत किंवा रोजगार असलेल्या मनूष्यबळाला पुनर्कौशल्य देण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

याशिवाय मंत्रालय खादी आणि ग्रामोद्योग आयोग, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, कॉयर बोर्ड आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राष्ट्रीय संस्था आणि विकास आयुक्त, एम एस एम ई च्या क्षेत्रीय कार्यालयांमार्फत कौशल्य/उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित करते.

ही सर्व केंद्रे  स्थानिक उद्योग संघटना आणि शैक्षणिक संस्थांशी निकट सहकार्य करून कार्य करतात.

सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1944337) अभ्यागत कक्ष : 113
Read this releasein: English , Tamil , Telugu