ग्रामीण विकास मंत्रालय
दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने महिलांचा आवाज, निवड आणि कार्यशक्ती बळकट करण्याच्या उद्देशासह कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात स्त्रियांनाही बरोबरीने आणण्यासाठी लक्ष्यित हस्तक्षेप केला आहे : चरणजित सिंह
Posted On:
29 JUL 2023 3:34PM by PIB Mumbai
ग्राम विकास मंत्रालय आणि अर्थव्यवस्थेत महिला आणि मुलींना प्रगत करण्यासाठीचा उपक्रम असलेल्या आयडब्लूडब्लूएजीई यांनी संयुक्तपणे नवी दिल्ली येथे दोन दिवसीय सल्लामसलत कार्यशाळेचे आयोजन केले होते. 2016 पासून, दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने कार्यक्रमांमध्ये महिलांचा आवाज, निवड आणि कार्यशक्ती बळकट करण्याच्या उद्देशासह मुख्य प्रवाहात महिलानाही बरोबरीने आणण्यासाठी लक्ष्यित हस्तक्षेप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे ग्राम विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंह यांनी आपल्या मुख्य भाषणात नमूद केले.

दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाने देशात मूक क्रांती घडवून आणली आहे आणि त्याचा परिवर्तनवादी दृष्टीकोन महिलांच्या नेतृत्वाखालील आणि महिलांच्या मालकीच्या संस्था निर्माण करण्याच्या तत्त्वांवर आधारित आहे, असे या कार्यशाळेत बोलताना सहसचिव स्मृती शरण यांनी सांगितले. सामाजिक सक्षमीकरण आणि ग्रामीण गरीब महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान कार्यक्रमाची दोन मूलभूत तत्त्वे त्यांनी सामायिक केली.

या कार्यशाळेत 15 राज्यांतील एकूण 75 सहभागींसह एससीओ भागीदार सहभागी झाले होते. आसाम, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशा, नागालँड, बिहार, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी , राजस्थान, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यातील सहभागींच्या समृद्ध अनुभवांच्या माध्यमातून देशातील जेंडर रिसोर्स केंद्र मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांवर पुन्हा भर दिला गेला.
या चर्चांमुळे या केंद्रांची सध्याची व्याप्ती आणि आपल्यासमोर असलेल्या कामाच्या व्याप्तीवर विचार करण्यासाठी मदत झाली आहे, असे सहसचिव स्मृती शरण यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले.

***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1944023)