श्रम आणि रोजगार मंत्रालय

महिला बिडी कामगारांसाठीच्या योजना

Posted On: 27 JUL 2023 5:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2023

उपलब्ध आकडेवारीनुसार देशात 49.82 लाख नोंदणीकृत बिडी कामगार असून त्यापैकी 36.25 लाख महिला आहेत. बिडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक कल्याणकारी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे : 

  1. दहा रुग्णालये आणि 285 दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा. विशिष्ट उपचारांच्या खर्चासाठी परतफेड (उदा. कर्करोग, क्षयरोग, हृदयविकार, मूत्रपिंड प्रत्यारोपण).
  2. बिडी कामगारांच्या पाल्यांना पहिली ते महाविद्यालयीन/विद्यापीठीय शिक्षणाकरता इयत्ता/अभ्यासक्रम याचा विचार करता वर्षाकाठी 1000/- ते 25000 पर्यंत आर्थिक सहाय्य
  3. सुधारित एकीकृत गृहयोजना (आरआयएचएस) 2016 अंतर्गत पक्क्या घराच्या बांधकामासाठी 3 हफ्त्यात 1,50,000 रुपयांचे (प्रत्येक लाभार्थ्याला) अनुदान दिले जाते. या अंतर्गत 25:60:15 प्रमाणात अनुक्रमे 37,500, 90,000 आणि 22,500 रुपये दिले जातात. दरम्यान आरआयएचएस योजना प्रधानमंत्री आवास योजनेत संलग्न केली आहे.  

कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्रालय आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महासंघ (एनएसडीसी) यांच्या सहकार्याने कामगार आणि रोजगार मंत्रालय बिडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना पर्यायी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्य प्रशिक्षण देते.

केन्द्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943335) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Punjabi