वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योगातील क्षमता वाढीसाठी समर्थ योजनेअंतर्गत 1880 केंद्रांवर 1,83,844 लाभार्थ्यांना देण्यात आले प्रशिक्षण

Posted On: 26 JUL 2023 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2023

 

वस्त्रोद्योग मंत्रालयाने 2010-2018 या कालावधीत वस्त्रोद्योग मूल्य मालिकेतील कामगारांच्या कौशल्य विकास आणि क्षमता वाढीसाठी एकात्मिक कौशल्य विकास योजना (ISDS) या अंतर्गत अंब्रेला कौशल्य योजना लागू केली होती. ही योजना पुढे चालू ठेवण्यासाठी 2017-18 मध्ये समर्थ ची - स्कीम फॉर कॅपॅसिटी बिल्डिंग इन टेक्सटाईल सेक्टर (SCBTS) ची सुधारित कौशल्य योजना सुरू करण्यात आली. समर्थ योजनेंतर्गत  मागणीवर आधारित, रोजगाराभिमुख राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकट (NSQF) ला अनुकूल  कौशल्य कार्यक्रमाची निर्मिती केली जाते. यात, हातमाग आणि विणकाम  वगळता वस्त्रोद्योगातील संपूर्ण मूल्य साखळी समाविष्ट करून संघटित वस्त्रोद्योग आणि संबंधित क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्योगाच्या प्रयत्नांना पूरक ठरते.

समर्थ योजना मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. समर्थ योजनेंतर्गत देशात कार्यरत असलेल्या प्रशिक्षण केंद्रांचा राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्ट-I मध्ये दिला आहे.  

एकात्मिक कौशल्य विकास योजना  2017-18 पर्यंत कार्यरत होती. समर्थ  योजनेंतर्गत  गेल्या तीन वर्षातील आणि चालू वर्षातील लाभार्थींच्या संख्येचा तपशील, तामिळनाडूसह राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार परिशिष्ट-II मध्ये दिलेला आहे.

ही माहिती वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री  दर्शना जरदोश यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

Annexure-I & II

 

* * *

R.Aghor/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1942976) Visitor Counter : 97


Read this release in: English , Urdu , Tamil