इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आसाममधील दिव्यांग महिलेची आधारमुळे झाली कुटुंबियांसमवेत पुन्हा भेट
Posted On:
21 JUL 2023 5:44PM by PIB Mumbai
आधारकार्डामुळे एक कुटुंब जोडले गेले आहे. यावेळी आसाममधील एका घरातून अनेक आठवड्यांपासून हरवलेल्या एका दिव्यांग महिलेची तिच्या कुटुंबियांसमवेत पुन्हा भेट झाली आहे.
वाणी आणि श्रवणदोष असलेली, आणि संवाद साधण्यास असमर्थ असलेली ही महिला, सोनितपूर जिल्ह्यातील खानमुख गावातील तिच्या घरापासून बेपत्ता झाली होती, पण ती तिच्या गावापासून सुमारे 165 किलोमीटर अंतरावर असलेल्या, कामरूप जिल्ह्यातील सोनापूर न्यू मार्केट याठिकाणी सापडली आणि आधारकार्डच्या सहाय्याने तिचा शोध घेण्यात आला.
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्तीच्या सबल उप-योजनेअंतर्गत महिलांना मनोसामाजिक समुपदेशन आणि तात्पुरता निवारा देणाऱ्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ या बिगर सरकारी संस्थेकडे पोलिसांनी तिला सुपूर्द केले. लेखन आणि सांकेतिक भाषेद्वारे संवाद स्थापित करणे शक्य नव्हते म्हणून तिला चित्रे दाखवण्यात आली; त्यावेळी तिने आधार कार्डाकडे निर्देश केला.
त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या गुवाहाटी प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधला असता, त्यांनी आपली मदत देऊ केली आणि या महिलेच्या संभाव्य आधार नोंदणीसाठी तिचे फिंगरप्रिंट बायोमेट्रिक्स पाठविण्याचा सल्ला दिला.
बायोमेट्रीक्स पाठविल्यावर, तिचे विद्यमान आधार बायोमेट्रिक्स जुळले जाऊ शकतात आणि तिच्या आधार तपशीलांवरून, तिच्या घराचा पत्ता शोधला जाऊ शकतो आणि या महिन्याच्या सुरुवातीला तिला तिच्या कुटुंबासह पुन्हा एकत्र केले जाऊ शकते, हे समजले.
आधार नावनोंदणी केवळ राहणीमान सुलभ आणि उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी सहाय्य करत नाही तर कुटुंबापासून विभक्त झालेल्या व्यक्तींची पुनश्च भेट करून देण्यात मदत करू शकते. म्हणून, मुलांची लवकरात लवकर नोंदणी केली जावी, आणि त्यांची बायोमेट्रिक्स एकदा त्यांच्या वयाची पाच वर्षे पूर्ण झाल्यावर आणि 15 वर्षे पूर्ण झाल्यावर अपडेट केली जावी, असे आवाहन यूआयडीएआय (UIDAI) करत असते. अशी नोंदणी करणे आणि ती अद्ययावत करणे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि देशभरातील सर्व आधारकेंद्रांवर ही नोंदणी केली जाऊ शकते.
***
SThakur/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1942757)
Visitor Counter : 157