सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
तांत्रिक शिक्षणासाठी संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) निधी
Posted On:
24 JUL 2023 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2023
संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) साठी नवीन मार्गदर्शक तत्व, 2023 अंतर्गत, (MPLADS) निधी शैक्षणिक हेतूंसाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह माहिती तंत्रज्ञान प्रणाली खरेदीसाठी वापरला जाऊ शकतो. [(MPLADS) निधी अंतर्गत परवानगी असलेल्या कामांच्या सूचक सूचीचा मुद्दा-3.3]. मात्र, ही यादी परिपूर्ण नसून संसद सदस्याच्या शिफारशींनुसार योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अध्याय-5 मध्ये दिलेल्या एकूण तत्त्वांच्या अधीन राहून यादीमध्ये नवीन कामे जोडली जाऊ शकतात.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), नियोजन मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1942246)