पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पेट्रोलियम उत्पादनांवर अनुदान

Posted On: 24 JUL 2023 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2023

 

पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत कुटुंबांमध्ये एलपीजीचा वापर वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने या योजनेच्या  लाभार्थ्यांसाठी 2022-23 आणि 2023-24 साठी वर्षाला 12 रिफिलपर्यंत प्रति 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडर रिफिलसाठी 200 रुपये अनुदान सुरू केले आहे. ग्राहकांमध्ये एलपीजीच्या  वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम  म्हणून, पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत कुटुंबांद्वारे एलपीजीचा दरडोई वापर 2019-20 मधील  3.01 रिफिलवरून 2022-23 मध्ये 3.71 रिफिलवर गेला आहे.

2023-24 वर्षासाठी एलपीजी साठी थेट लाभ हस्तांतरणासाठी तरतूद करण्यात आलेला निधी  (अर्थसंकल्पीय अंदाज) 2022-23 (सुधारित अंदाज) च्या निधीइतकाच म्हणजे 180 कोटी रुपये आहे. त्या त्या वेळी निर्माण होणारी स्थिती आणि खर्चाच्या स्थितीच्या आधारे सरकार वर्षभरातील आपल्या अर्थसंकल्पीय आवश्यकतांचा आढावा घेते. उदाहरणार्थ, 2022-23 वर्षासाठी पंतप्रधान उज्वला योजनेसाठी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या सुरुवातीला  800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यात नंतरच्या टप्प्यात दुरुस्ती करून ती  8010 कोटी रुपये करण्यात आली.

तसेच, देशांतर्गत एलपीजी ग्राहकांना आंतरराष्ट्रीय किमतीतील चढ-उतारांपासून संरक्षण पुरवण्यासाठी, सरकार घरगुती एलपीजीसाठी ग्राहकांसाठी लागू दरात बदल करत आहे. कोविड महामारी दरम्यान, 2020 मध्ये  केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत पंतप्रधान उज्वला योजनेच्या लाभार्थी  कुटुंबांना सुमारे 14.17 कोटी मोफत एलपीजी  रिफिल देखील पुरवले  होते.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू  राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1942235) Visitor Counter : 128
Read this release in: English , Urdu , Telugu