दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हितधारकांकडून सूचना मागवण्यासाठी दूरसंचार ग्राहक शिक्षण आणि संरक्षण निधी (सहावी दुरुस्ती) अधिनियम, 2023 मसुदा जारी केला

Posted On: 24 JUL 2023 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2023

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) हितधारकांकडून सूचना मागवण्यासाठी दूरसंचार ग्राहक शिक्षण आणि संरक्षण निधी (सहावी दुरुस्ती) अधिनियम, 2023 मसुदा जारी केला.

ट्राय ने 15 जून 2007 रोजी दूरसंचार ग्राहक शिक्षण आणि संरक्षण निधी अधिनियम, 2007 [(2007 चा 6) [यानंतर मुख्य नियम म्हणून ओळखला जाईल] अधिसूचित केले होते. या नियमांच्या संदर्भात, "दूरसंचार ग्राहक शिक्षण आणि संरक्षण निधी" (TCF) नावाचा निधी तयार करण्यात आला. या निधीतून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर ग्राहकांपर्यंत माहितीचा प्रसार करण्यासाठी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा  कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा, शैक्षणिक आणि जागरूकता विषयक आशय सामग्री विकसित करणे आदी उपक्रम हाती घेण्यासाठी केला जातो.  नियमांनुसार स्थापित दूरसंचार ग्राहक शिक्षण आणि संरक्षण निधी वापर समिती (यापुढे "CUTCEF" म्हणून संदर्भित) व्यवस्थेद्वारे  उपक्रम आखले जातात.

प्राधिकरणाला असे आढळून आले आहे की हिशेबाचे काम आणि लेखापरीक्षण तसेच CUTCEF च्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी ग्राहक समूहांच्या  प्रतिनिधींच्या सहभागासाठी TCEPF मधून  खर्च करावा लागतो आणि नियमांमध्ये तशा तरतुदी आवश्यक आहेत. त्यानुसार, मुख्य नियमाच्या 6 आणि 13 नियमनात सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

2020 मध्ये, कॉर्पोरेशन बँक, ज्यामध्ये TCEPF निधी जमा आहे, तिचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. आणि ग्राहक संरक्षण कायदा, 2019 (2019 चा 35) द्वारे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 (1986 चा 68)  रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य नियमांमध्ये संबंधित तरतुदी बदलण्यासाठी दुरुस्ती  करण्यात आली आहे.

मसुदा नियम TRAI संकेतस्थळ www.trai.gov.in वर उपलब्ध आहे आणि 14 ऑगस्ट 2023 पर्यंत हितधारकांच्या सूचनांसाठी खुला असेल.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1942219) Visitor Counter : 82


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu