गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील महिपालपूर कॅम्पस येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या विमान वाहतूक सुरक्षा नियंत्रण केंद्राचे केले उद्घाटन

Posted On: 22 JUL 2023 7:21PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील महिपालपूर परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) विमान वाहतूक सुरक्षा नियंत्रण केंद्राचे (ASCC) उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक शीलवर्धन सिंग आणि दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

आजपासून सुरू होणाऱ्या विमान वाहतूक सुरक्षा नियंत्रण केंद्राचे (एएससीसी) खालील 04 घटक असतील:-

संपर्क आणि देखरेख केंद्र :

हे केंद्र वर्षभर आणि दिवसाचे चोवीस तास 24x7x365 स्फोटकांबाबतचे कॉल, व्हीव्हीआयपी हालचाली आणि अन्य प्रमुख घटना, विमानतळांवरील प्री एम्बर्केशन सिक्युरिटी चेक (PESC) क्लिअरिंग टाइम इत्यादी बाबींचे निरीक्षण करेल.

उत्तम समन्वय आणि सहकार्यासाठी सर्व विमानतळ विभाग FHQrs/APS HQrs/Sector/Zonal HQrsØ बाह्य संस्था आणि भागधारकांशी द्विमार्गी संप्रेषण.

 

घटना व्यवस्थापन केंद्र:

तंत्रज्ञानसंबंधी गॅझेटशी संबंधित सर्व संबंधित माहिती मनुष्यबळ, आकस्मिक योजना, भौगोलिक माहिती प्रणाली, फ्लोअर प्लॅन आणि विमानतळांचे मॉडेल उपलब्ध असतील, जे कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीत त्वरित निर्णय घेण्यासाठी मदत करतील.

 

विमान चालन संशोधन केंद्र : यात समाविष्ट आहे :

संशोधन आणि विश्लेषण:

नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि विश्लेषण करणे.

गॅझेट्सचे थ्रूपुट (विशिष्ट कालावधीत काही प्रक्रिया करून तयार केलेले उत्पादन) आणि कार्यक्षमतेचा अभ्यास करणे.

विविध विमानतळांवर स्थापित केलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करणे.

 

डेटा आणि ट्रेंड विश्लेषण :

विमानतळांवर घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण.

निर्गमन द्वार आणि एसएचए येथील गर्दीचे विश्लेषण करणे.

सॉफ्टवेअर विकसन :

डेटाबेस अद्यतनित करणे आणि सुरक्षित करणे.

सॉफ्टवेअर विकसन आणि चाचणी

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना प्रशिक्षण देणे.

 

डेटा सेंटर : हे तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. त्यात खालील वैशिष्ट्ये आहेत:

300 TB साठवण क्षमता.

ऍप्लिकेशन होस्टिंग आणि डेटाबेससाठी सर्व्हर.

एमटीएनएल कडून 50 mbps लीज लाइन.

व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क द्वारे विमानतळ डेटा सुरक्षा.

विमानतळ, प्रदेश, विभाग आणि मुख्यालयांसाठी 110 इंटरकॉम टेलिफोन कनेक्शनची क्षमता असलेले IP-PBX

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1941786) Visitor Counter : 116