मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या हस्ते एनडीडीबी आणंद येथे जी 20 च्या कृषी कार्यगट अंतर्गत शाश्वत पशुधन परिवर्तनावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन
Posted On:
19 JUL 2023 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जी 20 च्या कृषी कार्यगटाच्या अंतर्गत एनडीडीबी आणंद येथे शाश्वत पशुधन परिवर्तनावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी उद्घाटन केले.

परिसंवाद आयोजित केल्याबद्दल रुपाला यांनी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची प्रशंसा केली आणि पशुधन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले की, या परिसंवादातील चर्चेमुळे शाश्वत परिवर्तनासाठी पशुधन क्षेत्रातील विविध अभिनव संशोधनांचा प्रसार करण्यात मदत होईल. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या विकासात्मक उपक्रमांची प्रशंसा करताना रुपाला म्हणाले की त्यांनी पशुसंवर्धन हे स्वतंत्र मंत्रालय बनवले आणि या क्षेत्राच्या वाढीत या मंत्रालयाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, ब्रीड मल्टिप्लिकेशन फार्म आणि राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम ही त्याची उदाहरणे आहेत. जगभरात कोविडचा प्रादुर्भाव होण्याच्या एक वर्ष आधी पंतप्रधानांनी गुरांच्या लसीकरणासाठी निधीची तरतूद केली होती. पशुपालनाशी संबंधित साथीच्या रोगांविरुद्ध सज्जतेसाठी एका मॉडेल अॅपची माहिती रुपाला यांनी दिली.

2 दिवस चाललेल्या या परिसंवादाचे उद्दिष्ट पशुधन क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करून अधिक कार्यक्षम आणि शाश्वत कृषी-अन्न प्रणालींमध्ये परिवर्तन करण्याबाबत व्यवहार्य चर्चा आणि विचारमंथन करण्याला चालना देणे हे होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जी 20 समूहातील प्रतिष्ठित तज्ञ, धोरणकर्ते आणि हितधारकांनी पशुधन क्षेत्राची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण केली, अनुभव सामायिक केले आणि अभिनव दृष्टिकोन मांडले.
या कार्यक्रमात WOAH- (जागतिक पशु आरोग्य संघटना), WHO- (जागतिक आरोग्य संघटना ), FAO-(अन्न आणि कृषी संघटना), IDF-(आंतरराष्ट्रीय दूध महासंघ ), NDDB-(राह्स्त्रीय दुग्ध विकास मंडळ) आणि विभागातील तज्ञांबरोबर पॅनेल चर्चा झाली.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940798)