दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युनिव्हर्सल पोस्टल युनियन जागतिक पोस्टल नेटवर्क वापरून सीमावर्ती भागात वित्तप्रेषणासाठी युपीआय चे मूल्यांकन करणार

प्रविष्टि तिथि: 18 JUL 2023 10:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2023

 

युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयु ) चे महासंचालक मासाहिको मेटोकी यांनी आज नवी दिल्लीत दळणवळण , इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मेटोकी हे युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या प्रादेशिक कार्यालयाच्या उद्घाटनासाठी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी टपाल कार्यालयाचे डिजिटली पॉवर नेटवर्कमधील  रुपांतर याबाबत माहिती दिली, जे  दुर्गम भागात सरकारी सेवा घरोघरी पोहोचवण्यास सक्षम आहे. युपीआय आणि आयपीपीबी द्वारे आर्थिक समावेशासाठी भारतातील टपाल कार्यालये यशस्वी आदर्श ठरली आहेत.

संवादादरम्यान, युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या महासंचालकांनी डिजिटल पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारतातील टपाल कार्यालयांच्या विस्ताराचे कौतुक केले आणि इतर देशांमध्ये अशाच मॉडेल्सची प्रतिकृती तयार करण्याचे समर्थन केले. टपाल सेवेद्वारे सीमावर्ती भागात वित्तप्रेषणाची सेवा जोडण्यासाठी युपीआय प्लॅटफॉर्मचे मूल्यांकन करण्याबाबत  त्यांनी सहमती दर्शविली.

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 1940611) आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी