रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील पर्वतीय रस्ते संबंधी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या तांत्रिक सहाय्याने मार्गदर्शक तत्त्वे केली विकसित

Posted On: 14 JUL 2023 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीच्या  (जेआयसीए- जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था)  तांत्रिक सहाय्याने, देशातील  पर्वतीय रस्ते पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने पाच मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे डोंगराळ प्रदेशात उच्च-गुणवत्तेचे आणि शाश्वत रस्ते प्रकल्प सुनिश्चित करण्यासाठी तयार केली गेली असून यामुळे  रस्त्यांचे जाळे सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.

ही मार्गदर्शक तत्त्वे भारतीय रस्ते काँग्रेस   (आयआरसी - इंडियन रोड काँग्रेस ) द्वारे प्रकाशित करण्यात आली होती. ती  7 जुलै 2023 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मंत्री  नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत  छत्तीसगडमधील रायपूर  येथे संस्थेच्या  225 व्या मध्यावधी  बैठकीच्या उद्घाटन समारंभात जारी करण्यात आली होती. यावेळी  छत्तीसगडचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग (रस्ते विकास)  चे महासंचालक व  विशेष सचिव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शक तत्वांमध्ये  खालील विषयांबाबत डोंगराळ प्रदेशात रस्ते बांधणीसाठी तांत्रिक वैशिष्ठ्ये  आणि सर्वोत्तम पद्धतीचा समावेश आहे :

1. डोंगराळ प्रदेशातील  रस्त्यांचे नियोजन

2. प्रगत तंत्रज्ञानासह उतार संरक्षण आणि तटबंदी

3. डोंगराळ भागातील मुख्य  रस्त्यांवरील बोगदा

4. प्रगत तंत्रज्ञानासह पर्वतीय पूल

5. पर्वतीय महामार्गांचे कार्यान्वयन आणि देखभाल

व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक विकास सुलभ करण्यासाठी उत्तम रस्ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने  रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्रालय  आणि जेआयसीए  यांनी 2016 ते 2021 या कालावधीत "पर्वतीय  प्रदेशातील महामार्गांबाबत क्षमता विकास प्रकल्प" राबविण्यास सहमती दर्शवली होती.

 

 S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1939637) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi