रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुरक्षा उपाययोजना वाढवण्यासाठी तसेच देशभरातील रेल्वेच्या मालमत्तेची आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलाची गुन्हेगारांवर कठोर कारवाई

Posted On: 14 JUL 2023 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2023

देशभरातील रेल्वे सुरक्षा उपायोजनांमध्ये   वाढ करणे तसेच  रेल्वेच्या मालमत्तेची आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अलीकडेच जून 2023 मध्ये  संपूर्ण भारतात महिनाभर मोहीम राबवली.  ही व्यापक मोहीम तीन प्रमुख पैलूंवर  केंद्रित होती :

चोरी झालेल्या रेल्वे मालमत्तेच्या प्राप्तकर्त्यांविरुद्ध  आणि रेल्वे मालमत्तेची चोरी/गुन्हेगारी गैरवापर यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांच्या आश्रयस्थानांविरोधात पहिली मोहीम होती .चोरी झालेली  रेल्वेची  मालमत्ता मिळवण्याच्या गुन्ह्यात सहभागी  व्यक्तींवर आणि रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा गुन्हेगारी गैरवापर करणाऱ्या  गुन्हेगारांना आश्रय देणाऱ्यांवर आरपीएफने कठोर कारवाई सुरू केली. संपूर्ण भारतात महिनाभर चाललेल्या या  मोहिमेदरम्यान, आरपीएफने चोरी झालेली  रेल्वे मालमत्ता स्वीकारणाऱ्या  90 जणांना ताब्यात घेतले तसेच  5.7 लाख रुपयांची चोरी झालेली रेल्वे मालमत्ता जप्त करून 80 गुन्हे नोंदवण्यात आले.

डिजिटल पदठसे /डेटा प्रोसेसिंग आणि सीसीटीव्ही छायाचित्रण  वापरून रेल्वे परिसरात प्रवाशांनी नोंदवलेले गुन्हे रोखणे/शोधणे हा दुसरा केंद्रित दृष्टिकोन होता. महिनाभर चाललेल्या मोहिमेदरम्यान, आरपीएफने 4९३  गुन्ह्यांची उकल केली  आणि प्रवाशांच्या सामानाची चोरी, दरोडा, महिलांविरुद्धचे गुन्हे आणि रेल्वे तिकीटांची अवैध विक्री या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 484  आरोपींना अटक केली.

देशभर राबवलेल्या या  मोहिमेचा तिसरा पैलू गुन्ह्यातील मालमत्तेचा कार्यक्षमतेने निपटारा  हा होता. कायदेशीर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि प्रामाणिकपणे  तपास होण्याच्या दृष्टीने मालमत्तेचा योग्य तऱ्हेने  निपटारा करण्याचे महत्त्व आरपीएफने  ओळखले. महिनाभर चाललेल्या या मोहिमेदरम्यान 426 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

देशभरातील रेल्वे मालमत्तेची आणि प्रवाशांची सुरक्षा आणि संरक्षण  सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल वचनबद्ध आहे.

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1939455)