विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
चांद्रयान मोहीम जागतिक स्तरावर भारताने घेतलेली मोठी झेप ठरेल; भारताच्या कोविड लसीच्या यशोगाथेनंतर आता चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या स्वदेशी क्षमतांचा पुनरुच्चार करतानाच जागतिक पटलावर भारताचे स्थान अधिक भक्कम करेल - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह
हैदराबाद येथे भारत आणि ब्रिटन यांच्या 11 व्या इंडिया अलायन्स वार्षिक परिषद 2023 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जितेंद्र सिंह यांनी केले संबोधित
Posted On:
13 JUL 2023 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जुलै 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की कोविड लसीनंतर, चांद्रयान-3 ही मोहीम म्हणजे जागतिक क्षेत्रात भारताने घेतलेली मोठी झेप ठरेल आणि भारताच्या कोविड लसीच्या यशोगाथेनंतर आता चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या स्वदेशी क्षमतांचा पुनरुच्चार करतानाच जागतिक पटलावर भारताचे स्थान अधिक भक्कम करेल.
हैदराबाद येथे आयोजित भारत आणि ब्रिटन यांच्या 11 व्या इंडिया अलायन्स वार्षिक परिषद 2023 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाच्या पूर्वसंध्येला होत असलेली ही विज्ञान परिषद हेच सिध्द करते की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अनेक आघाडीच्या क्षेत्रांमध्ये विकसित देश अधिकाधिक प्रमाणात भारताकडून भागीदारीची अपेक्षा करत आहेत.

इंडिया अलायन्स म्हणजे केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि ब्रिटन सरकारचा वेलकम ट्रस्ट यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण भागीदारी आहे ज्यामध्ये जागतिक परिणाम साधून शकेल अशी मजबूत, जागतिक दर्जाची, जैववैद्यकीय संशोधन विषयक मानवी संसाधने मोठ्या प्रमाणात उभारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की इंडिया अलायन्सच्या गेल्या 15 वर्षांतील प्रभावी प्रवासाने भारतातील संशोधन तसेच वित्तपुरवठा परिसंस्थेला मजबूती दिली आहे आणि देशातील जैववैद्यकीय आणि वैद्यकीय संशोधन परिसंस्थेमध्ये प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी यशस्वी अंमलबजावणी तसेच उपक्रम शक्य केले आहेत. वर्ष 2019 मध्ये, स्थापनेला 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंडिया अलायन्सने आंतरशाखीय तसेच सहयोगात्मक संशोधन आवश्यक असलेल्या आधुनिक समाजाच्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी टीम विज्ञान अनुदाने आणि वैद्यकीय/सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्रांची स्थापना केली अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की इंडिया अलायन्सने भारताची संशोधनविषयक परिसंस्था मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेल्या, भारतीय संशोधन संस्थांतील संशोधन व्यवस्थापनाची क्षमता उभारण्यासाठी देखील गुंतवणूक केली आहे. इंडिया अलायन्सने अखिल भारतीय दृष्टीकोनासह 589 संशोधकांना फायदा मिळवून दिला आहे आणि भारतातील 48 शहरांमधल्या 137 विविध संघटनांना वित्तपुरवठा केला आहे.
टीम विज्ञान अनुदाने आणि वैद्यकीय तसेच सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्रांच्या अनुदानाअंतर्गत इंडिया अलायन्सने भारताच्या संशोधनविषयक क्षमता आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आंतरराष्ट्रीय आणि बहुशाखीय सहयोगी संबंधांसाठी सुलभता निर्माण केली.
डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, इंडिया अलायन्सकडून अनुदाने मिळालेल्या अनेकांनी कोविड काळात त्यांच्या संबंधित संस्थांना गरज भासली त्यानुसार कोविड-19 चे निदान आणि उपचार यामध्ये सहभाग घेतला आणि वैद्यकीय तसेच सार्वजनिक आरोग्यविषयक संशोधन क्षमतेच्या उभारणीसाठी त्याची भर घातली.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, विज्ञानविषयक संवादाला प्रोत्साहन देणे आणि विज्ञान विषयात सार्वजनिक सहभाग वाढवणे हे इंडिया अलायन्सचे ध्येय आणि आजच्या काळाची गरज आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939319)
Visitor Counter : 173