वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसेच युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे (इफ्ता) उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांच्यात लंडनमध्ये यशस्वी बैठक

Posted On: 12 JUL 2023 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री  पीयूष गोयल आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचे (इफ्ता) उच्चस्तरीय शिष्टमंडळ यांच्यात लंडनमध्ये दोन दिवसीय बैठक झाली. स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार मंत्री  हेलेन बडलागर आर्टिडा यांनी ‘इफ्ता’ शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. अत्यंत फलदायी ठरलेल्या दोन दिवसीय बैठकीचा आज समारोप झाला. संघटनेच्या सदस्य देशांतील  फार्मास्युटिकल, मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांतील उद्योग भागधारक यावेळी उपस्थित होते.

व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (TEPA -तेपा) वाटाघाटी त्वरित पूर्ण करण्याच्या सामायिक उद्दिष्टासह, पीयूष गोयल आणि बडलिगर आर्टिडा यांच्यातील चर्चा फलदायी ठरली. त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली. भारत आणि इफ्ता यांच्यात एक निष्पक्ष, परस्पर फायदेशीर आणि सर्वसमावेशक व्यापार करार करणे हे या वाटाघाटींचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि ‘इफ्ता’ ने ‘तेपा’ वाटाघाटी लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी उभयपक्षी वचनबद्धतेवर प्रकाश टाकत, त्यांच्या प्रतिबद्धतेत लक्षणीय वाढ केली आहे. लंडनमधील बैठकीने या वचनबद्धतेला आणखी बळ मिळाले. दोन्ही बाजूंनी अंतिम कराराच्या दिशेने वाटचाल करण्याची तीव्र इच्छा दर्शविली.

बैठकीतील प्रगतीबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केले. चर्चेच्या रचनात्मक आणि सहयोगी स्वरूपाविषयी मते मांडली. भारत आणि इफ्ता या दोघांच्याही आकांक्षा पूर्ण करणार्‍या दृढ आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देणाऱ्या आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या सर्वसमावेशक व्यापार कराराच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

आर्टिडा यांनीही गोयल यांच्या सूरात सूर मिसळला आणि भारत सरकारच्या सक्रिय दृष्टिकोनाची प्रशंसा केली. सर्वसमावेशक ‘तेपा’ करारा द्वारे साकारल्या जाणाऱ्या सकारात्मक फलनिष्पत्तीबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.

लंडनमधील यशस्वी बैठकीमुळे भारत आणि इफ्ता यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींना आणखी गती मिळाली. दोन्ही क्षेत्रांमधील आर्थिक सहकार्य आणि व्यापार वाढवण्याची क्षमता ओळखून दोन्ही बाजूंनी ‘तेपा’ ला चालना देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. अंतिम करार भारत आणि ‘इफ्ता’साठी नवीन सखोल आर्थिक सहकार्यासाठी  वाढ आणि समृद्धीचा मार्ग तयार करेल.

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1939085) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil