संरक्षण मंत्रालय
जपान भारत सागरी युद्धसराव 2023(जिमेक्स 23) चा झाला समारोप
Posted On:
11 JUL 2023 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2023
भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरात आयोजित केलेल्या जपान भारत सागरी युद्धसराव 2023(जिमेक्स 23) या सातव्या युद्धसरावाचा आज दोन्ही बाजूंकडून पारंपरिक स्टीमपास्टने एकमेकांना निरोप देत समारोप झाला. भारतीय नौदलाची दिल्ली, कमोर्ता आणि शक्ती ही जहाजे , ईस्टर्न फ्लीटचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल गुरुचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आणि जपान सागरी स्वसंरक्षण दलाचे (JMSDF) सॅमिदारे हे जहाज रिअर ऍडमिरल निशियामा तकाहिरो, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला वन यांच्या नेतृत्वाखाली या सहा दिवसांच्या युद्धसरावात सहभागी झाले होते.
जिमेक्स 23 अंतर्गत दोन्ही नौदलांनी संयुक्तपणे अतिशय गुंतागुंतीचे सराव केले. सागरी युद्धामधील पृष्ठभाग, उप-पृष्ठभाग आणि हवा या तिन्ही क्षेत्रातील अत्याधुनिक स्तरावरील युद्धसरावात ही दले सहभागी झाली. जहाजे आणि त्यांच्यावर तैनात असलेली हेलिकॉप्टर्स व्यतिरिक्त या सरावात लढाऊ विमाने, सागरी गस्ती विमाने आणि एक पाणबुडी देखील सहभागी झाली होती. भारतीय नौदल आणि JMSDF यांनी सामाईक प्रक्रियांचे पुनर्पुष्टीकरण आणि आंतरपरिचालनक्षमता वृद्धिंगत करत अतिशय उच्च पातळीवर या सरावाचा समारोप केला.
S.Kane/S.Patil/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938815)
Visitor Counter : 243