वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने ‘पेयजल बाटल्या’ आणि ‘फ्लेम प्रोड्युसिंग लाइटर’ साठी गुणवत्ता नियंत्रण आदेश केले अधिसूचित

Posted On: 11 JUL 2023 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2023

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने  (डीपीआयआयटी )   5 जुलै 2023 रोजी दोन नवीन गुणवत्ता नियंत्रण आदेश (क्यूसीओ ) यशस्वीरित्या अधिसूचित केले आहेत.'पेयजल  बाटल्या' आणि 'फ्लेम प्रोड्युसिंग लाइटर्स'वरील हे गुणवत्ता नियंत्रण आदेश  अधिसूचनेच्या तारखेपासून सहा महिन्यांनी लागू होतील.भारतातील गुणवत्तेसंदर्भातील व्यवस्था  बळकट  करणे आणि ग्राहकांचे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता वाढवणे हे या  गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उद्दिष्ट आहे

‘पेयजल बाटल्यांसाठी ’ असलेले  गुणवत्ता नियंत्रण आदेश, तांबे, स्टेनलेस स्टील किंवा अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या पेयजल  बाटल्यांचे उत्पादन आणि आयात करण्यासाठी योग्य आयएस  मानकांअंतर्गत अनिवार्य प्रमाणपत्र  बंधनकारक करतात.

‘फ्लेम-प्रोड्यूसिंग लाइटर’ साठी असलेले  गुणवत्ता नियंत्रण आदेशदेशांतर्गत बाजारपेठेसाठी उत्पादित किंवा भारतात आयात केलेल्या फ्लेम लाइटरसाठी ‘लाइटर्स सुरक्षितता तपशील’ आणि ‘उपयुक्त   लाइटर्ससाठी सुरक्षा तपशील’साठीआयएस  मानकांनुसार अनिवार्य प्रमाणपत्र  बंधनकारक करतात.

डीपीआयआयटीचे  सचिव राजेश कुमार सिंह  यांनी जागतिक दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी भारतात गुणवत्ता संदर्भात  व्यवस्था  निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला .  हे  केवळ देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनातच  (जीडीपी) योगदान देणार नाही तर दर्जेदार उत्पादनांच्या बाबतीत भारताला जगाच्या नकाशावर ठळकपणे आणेल यावरही त्यांनी भर दिला.

गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या  अधिसूचनेसह, बीआयएस अधिनियम, 2016 नुसार बिगर -बीआयएस  प्रमाणित उत्पादनांचे उत्पादन, संचयन आणि विक्री प्रतिबंधित आहे.बीआयएस  कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. दुसऱ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यांच्या बाबतीत, दंड किमान 5 लाख रुपयांपर्यंत किंवा वस्तू किंवा मालाच्या  किंमतीच्या दहापट वाढू शकतो.

 

S.Kane/S.Chavan/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1938804) Visitor Counter : 126


Read this release in: English , Urdu , Hindi