सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत स्थापन सांस्कृतिक कार्यगटाने ‘लमाणी कलावस्तूंच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाच्या आयोजनातून गिनीज बुक मध्ये नोंदवला विक्रम


केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हम्पी इथे येडूरु बसवण्णा संकुलात प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Posted On: 10 JUL 2023 10:00PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 जुलै 2023

जी-20 च्या सांस्कृतिक कार्यगटाच्या हम्पी इथे सुरू झालेल्या तिसऱ्या  बैठकीचा भाग म्हणून, ‘संस्कृती जोडते सर्वांना’ ह्या मोहिमेअंतर्गत, आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने,‘लमाणी वस्तूंचे सर्वात मोठे प्रदर्शन’ आयोजित करुन, गिनीज बुक मध्ये आपले नाव नोंदवले आहे.

या लमाणी कशिदाकरीच्या ह्या खास प्रदर्शनाचे उद्घाटन आज केंद्रीय संसदीय कार्य आणि कोळसा तसेच खाणकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते येडूरु बसवण्णा संकुलात झाले.

प्रदर्शनाची संकल्पना ‘संस्कृती जोडते सर्वांना’ अशी आहे. या प्रदर्शनाचे शीर्षक ‘थ्रेड्स ऑफ युनिटी’ म्हणजे 'एकतेचे धागे' असे आहे . लमाणी भरतकामाच्या सौंदर्याच्या विविध छटा या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.

संदूर कुशल कला केंद्रा (SKKK) शी संबंधित 450 हून अधिक लमाणी महिला कारागीर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनी एकत्र येऊन 1755 पॅचवर्क असलेली GI-मिळालेली संदूर लमाणी भरतकाम करुन या  वस्तू तयार केल्या आहेत . गिनीज बुक जागतिक विक्रमाचा हा प्रयत्न ,पंतप्रधानांच्या मिशन ‘LiFe’ (पर्यावरणस्नेही जीवनशैली) मोहिमेशी आणि सांस्कृतिक कार्यगटाच्या ‘Culture for LiFe’, म्हणजे आयुष्यासाठी संस्कृती या पर्यावरणाबाबत जागरूक जीवनशैली आणि शाश्वततेच्या दिशेने एक ठोस कृती  म्हणून बघायला हवा.

यावेळी प्रल्हाद जोशी म्हणाले कीलमाणी पॅचवर्क कशिदाकाम, भारतातील अनेक पारंपारिक आणि शाश्वत कलांचे जिवंत उदाहरण आहे. तसेच, सांस्कृतिक कार्यगटाच्या ‘आयुष्यासाठी संस्कृती’ या तसेच, पंतप्रधानांच्या मिशन 'लाइफ' (पर्यावरणासाठी जीवनशैली) शी हे  प्रदर्शन सुसंगत आहे.

लमाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही सांस्कृतिक कार्यगटाच्या ‘संस्कृती सगळ्यांना जोडते’ ह्या मोहिमेचा भाग आहे. ही मोहीम, मानवतेची विविध रंगीबेरंगी आणि गतिमान सांस्कृतिक अभिव्यक्ति करणारी आहे, असे ते म्हणाले. ह्या लमाणी पॅचवर्क कशिदाकामात, एक मोठे वस्त्र तयार करण्यासाठी विविध तुकडे जोडले जातात. ही संकल्पना, संस्कृती सर्वांना जोडते’ ह्याच संकल्पनेशी अनुरूप असून, आपापली विविधता राखत सर्वांना एकत्रित आणणारी ही कला आहे.

लमाणी भरतकाम हे रंगीत धागे, मिरर वर्क आणि शिवणकामातून वैशिष्ट्यीकृत वस्त्र निर्मितीचा प्रकार आहे. कर्नाटकातील सांडूर, केरी तांडा, मरियम्मानहल्ली, कादिरामपूर, सीताराम तांडा, विजापूर आणि कमलापूर यासारख्या अनेक गावांमध्ये ही कशिदाकारी केली जाते. ही समृद्ध भरतकाम परंपरा, प्रामुख्याने लमाणी समाजातील हस्तकौशल्य येणाऱ्या महिलांनी जिवंत ठेवली आहे, त्यांच्या उपजीविकेचा आणि आर्थिक सक्षमीकरणाचा हा एक महत्वाचा स्त्रोत आहे.

 S.Patil/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1938541) Visitor Counter : 185


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada