अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंतरिम (तात्पुरत्या) आकडेवारीनुसार 9 जुलै 2023 पर्यंत स्थिर वाढीची नोंद
Posted On:
10 JUL 2023 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
9 जुलै 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंतरिम आकडेवारीनुसार स्थिर वाढ झाल्याचे दिसून येत आहे.9 जुलै 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराचे एकूण संकलन हे 5.17 लाख कोटी रूपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये झालेल्या एकूण संकलनापेक्षा यंदाचे करसंकलन 14.65 टक्क्यांनी जास्त आहे.
परताव्याचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन, 4.75 लाख कोटी रूपये आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 15.87 टक्के जास्त आहे. हे संकलन आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण अंदाजपत्रकीय अंदाजांच्या 26.05 टक्के आहे.
1 एप्रिल 2023 ते 9 जुलै 2023 या कालावधीमध्ये परतावा रक्कम 42,000 कोटी रूपये जारी करण्यात आली आहे.मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत ही रक्कम 2.55 टक्के जास्त आहे.
S.Patil/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938524)
Visitor Counter : 188