अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारने सरकारी रोखे (i) '7.06% GS 2028', (ii) '7.26% GS 2033' आणि (iii) '7.30% GS 2053' च्या विक्रीसाठी (पुनर्जारी ) लिलाव
Posted On:
10 JUL 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
केंद्र सरकारने (i) एकसमान किंमत पद्धत वापरून किंमत आधारित लिलावाद्वारे 8,000 कोटी रुपयांच्या (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी “7.06% सरकारी रोखे 2028” ची विक्री (पुनर्जारी), (ii) एकसमान किंमत पद्धत वापरून किंमत आधारित लिलावाद्वारे 14,000 कोटी (नाममात्र) रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी "7.26% सरकारी रोखे 2033" आणि (iii) एकाधिक किंमत पद्धती वापरून किंमत आधारित लिलावाद्वारे 11,000 कोटी (नाममात्र) रुपयांच्या अधिसूचित रकमेसाठी “7.30% सरकारी रोखे 2053” ची विक्री करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडे वर नमूद प्रत्येक सरकारी रोख्यांमध्ये 2,000 कोटी रुपयांच्या मर्यादेपर्यंत अतिरिक्त सब्स्क्रिप्शन कायम ठेवण्याचा पर्याय असेल. हे लिलाव भारतीय रिजर्व बँक , मुंबई कार्यालय, फोर्ट, मुंबई द्वारे 14 जुलै, 2023, (शुक्रवार) रोजी केले जातील.
रोख्यांच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या 5 टक्क्यांपर्यंतची रक्कम सरकारी रोख्यांच्या लिलावात बिगर-स्पर्धात्मक बोली सुविधा योजनेनुसार पात्र व्यक्ती आणि संस्थाना वितरित केली जाईल.
लिलावासाठी स्पर्धात्मक आणि बिगर-स्पर्धात्मक दोन्ही बोली भारतीय रिजर्व बँक कोर बैंकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणाली वर इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये 14 जुलै 2023 रोजी सादर होणे आवश्यक आहे. बिगर-स्पर्धात्मक बोली सकाळी 10:30 पासून 11:00 वाजेपर्यंत आणि स्पर्धात्मक बोली सकाळी 10:30 पासून 11:30 दरम्यान सादर व्हायला हवी.
लिलावांचे निकाल 14 जुलै , 2023 (शुक्रवार) रोजी घोषित केले जातील आणि यशस्वी बोलीदारांद्वारे भरणा 17 जुलै , 2023 (सोमवार) रोजी केला जाईल.
हे रोखे भारतीय रिजर्व बँकेच्या 24 जुलै 2018 रोजीच्या वेळोवेळी सुधारित परिपत्रक क्रमांक RBI/2018-19/25 अंतर्गत जारी केंद्र सरकारी रोखे व्यवहार संदर्भातील मार्गदर्शक तत्वांनुसार “व्हेन इशूड ” ट्रेडिंगसाठी पात्र असतील.
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938519)
Visitor Counter : 145