वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमध्ये केवडिया येथे 10 ते 12 जुलै 2023 दरम्यान होणार व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची तिसरी बैठक


जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीबाबतच्या समस्यांवरील कृती-केंद्रित उपाययोजनांवर G20 प्रतिनिधींमध्ये होणार चर्चा

Posted On: 08 JUL 2023 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2023

 

व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या (TIWG) दोन बैठकींच्या यशस्वी आयोजनानंतर गुजरातमध्ये केवडिया येथे 10-12 जुलै 2023 दरम्यान तिसरी बैठक होणार आहे. तीन दिवसांच्या या बैठकीला G20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 75 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित समस्यांवर भारताच्या अध्यक्षते अंतर्गत मांडल्या गेलेल्या कृती-केंद्रित प्रस्तावांची पूर्तता करण्यावर मतैक्य  निर्माण करण्यावर या बैठकीत भर दिला जाईल.

परिषदेच्या पहिल्या दिवशी, व्यापार पायाभूत सुविधेवरील परिषदेत, जागतिक मूल्य साखळीच्या विस्तारात (GVCs) लॉजिस्टिकची भूमिका आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) जागतिकीकरण, या विषयावर चर्चा होईल. चर्चासत्रानंतर G20 प्रतिनिधींसाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा मार्गदर्शित दौरा आणि राज्य सरकारतर्फे मेजवानीचे आयोजन केले जाईल.

व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या पहिल्या आणि दुसर्‍या बैठकीत, G20 सदस्य/निमंत्रित देशांमध्ये (i) विकास आणि समृद्धीसाठी व्यापार, (ii) लवचिक व्यापार आणि जागतिक मूल्य साखळी (iii) जागतिक व्यापारात एमएसएमईची एकात्मता  (iv) व्यापारासाठी लॉजिस्टिक आणि (v) जागतिक व्यापार संघटना  सुधारणा या पाच महत्वाच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.

11 आणि 12 जुलै रोजी, तांत्रिक सत्रे आयोजित केली जातील. यामध्ये भारताच्या अध्यक्षपदा अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर G20 सदस्य/निमंत्रित देशांकडून विशिष्ट सूचना/टिप्पण्या मागवल्या जातील. मंत्रिस्तरीय निवेदनाचा मसुदा तयार करताना या सूचना  योग्यरित्या समाविष्ट केल्या जातील. 24 ते 25 ऑगस्ट, 2023 या कालावधीत जयपूर येथे होणाऱ्या G20 व्यापार आणि गुंतवणूक मंत्रिस्तरीय बैठकीत त्यांना स्वीकृती मिळेल.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938222) Visitor Counter : 105


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu