भारतीय निवडणूक आयोग
उझबेकिस्तानच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचे आयोजन पाहण्यासाठी भारताचे निवडणूक आयुक्त, डॉ. अनुप चंद्र पांडे उझबेकिस्तान भेटीवर
Posted On:
08 JUL 2023 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2023
उझबेकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून, भारताचे निवडणूक आयुक्त, डॉ. अनुप चंद्र पांडे हे उद्या म्हणजेच 9 जुलै 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन पाहण्यासाठी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. चार उमेदवारांसह विद्यमान अध्यक्ष रिंगणात आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वमतानंतर उझबेकिस्तानमध्ये स्वीकारल्या गेलेल्या नवीन संविधानाच्या चौकटीत ही निवडणूक होत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहे.

तत्पूर्वी, डॉ. अनुप चंद्र पांडे आणि उझबेकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यांनी 6 जुलै 2023 रोजी निवडणूक सहकार्याबाबत एक बैठक घेतली. डॉ. पांडे यांनी भारतातील अलीकडील निवडणुकांबद्दल आणि उभय देशांमधील निवडणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी निवडणूक सहकार्य, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रमांवरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासारख्या विविध मार्गांविषयी सांगितले. उझबेकिस्तानच्या निवडणूक अधिकाऱ्यांसाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात भारतीय निवडणूक आयोगाने उत्सुकता दर्शवली.

निवडणूक आयुक्त डॉ अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि आर के गुप्ता यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळाने निवडणूक प्रशासन, प्रक्रिया आणि उझबेकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी 7 व्या आणि 14 व्या जिल्हा निवडणूक आयोगांना भेट दिली.
डॉ. पांडे ताश्कंद येथील अनिवासी भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी भारतीय निवडणुकांबाबत संवाद साधणार आहेत.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1938219)
Visitor Counter : 194