इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर बेंगळुरू इथे माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरसाठी पीएलआय-2 वरील डिजिटल इंडिया संवाद सत्राला उद्या संबोधित करणार

Posted On: 05 JUL 2023 8:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर उद्या बंगळुरूमध्ये आयटी हार्डवेअरसाठी अलीकडेच सुधारित केलेल्या' उत्पादन संलग्न प्रोत्साहन' (पीएलआय) योजनेवरील डिजिटल इंडिया संवाद सत्राला संबोधित करणार आहेत.

या बैठकीत विषयतज्ञ, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि स्टार्टअप्ससह यांच्यासह तंत्रज्ञान परिसंस्थेतील हितसंबंधीत सहभागी होतील. बैठकीचा उद्देश प्रगत  प्रोसेसर, बौद्धिक संपदा आणि एम्बेडेड सिस्टमच्या विकासाला चालना देणे हा आहे.यातील चर्चासत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कायदा आणि धोरण निर्मितीच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत. चंद्रशेखर सकाळी बेंगळुरूला पोहोचल्यानंतर  पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर ही संवादसत्रे होणार आहेत.

आर्थिक प्रोत्साहनांच्या तरतुदीद्वारे, सरकार आयटी क्षेत्रातील हार्डवेअर घटक आणि उप-घटकांच्या  स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेत लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर अशाप्रकारची उपकरणे समाविष्ट आहेत.याद्वारे, भारतातील देशांतर्गत आयटी हार्डवेअर उत्पादन परिसंस्थांना  सबल करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे आयटी हार्डवेअर उद्योगात भारतीय आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करेल.

मूल्य शृंखलेत मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढे आणण्यासाठी 2021 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या योजनेच्या निधीपेक्षा दुप्पट जास्त निधी देऊन मे मध्ये, सरकारने  माहिती तंत्रज्ञान (आयटी) हार्डवेअरसाठी 17,000 कोटी रुपयांच्या खर्चासह पीएलआय (PLI) 2.0 या योजनेला मंजुरी दिली.

या योजनेद्वारे सुमारे 3.35 लाख कोटी रुपयांचे  एकूण उत्पादन अपेक्षित आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनामध्ये 2,430 रूपये कोटींची अतिरिक्त गुंतवणूक होईल तसेच यामुळे 75,000 अतिरिक्त थेट रोजगार  निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

 

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1937611) Visitor Counter : 91