नागरी उड्डाण मंत्रालय

अयोध्या विमानतळाचे विकासकार्य सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

Posted On: 30 JUN 2023 7:43PM by PIB Mumbai

 

अयोध्या विमानतळाचे विकासकार्य सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  हे नवीन विमानतळ A-320/B-737 प्रकारच्या विमानांच्या संचलनासाठी उपयोगी ठरेल. एकूण 350 कोटी रुपये (अंदाजे) खर्च करून विकसित केले जात आहे.

या विकास कामांमध्ये, इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रुल्स (IFR), नियमानुसार कोड-C प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी सध्याच्या धावपट्टीचा विस्तार 1500m X 30m पासून 2200m x 45m पर्यंत करणेटर्मिनल इमारत उभारणी, एटीसी (ATC) मनोरा उभारणे, अग्निशमन केंद्र, कार पार्किंग, 03 असा संकेतांक असलेल्या 'सीप्रकारच्या विमान पार्किंग साठी नवीन ऍप्रन सुविधा तसेच शहरालगतच्या आणि विमानतळ लगतच्या पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे.

6250 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली नवीन टर्मिनल इमारत गर्दीच्या वेळेत 300 प्रवाशांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्ज असेल. प्रवाशांच्या सुविधांमध्ये, 08 चेक-इन-काउंटर, 03 कन्व्हेयर बेल्ट (01 निर्गमन आणि 02 आगमन हॉलमध्ये), पंचाहत्तर कारसाठी कार पार्किंग आणि 02 बस पार्किंगचा समावेश आहे.

विमानतळावर सुरू असलेल्या विकासकामांबद्दल आपली प्रतिक्रिया देतांना  केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले की, अयोध्या विमानतळावरील विकासकार्य भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये प्रगती करण्यासाठीचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा दूरदर्शी दृष्टिकोन दर्शविते. सिंधिया यांनी विमानतळाच्या  प्रगती बाबत ट्विट केले आहे.

हे ट्विट खालील लिंक वर बघता येईल.: https://twitter.com/JM_Scindia/status/1674041653487886337?s=20

***

R.Aghor/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936569) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu