संरक्षण मंत्रालय

आयएनएस शंकुश पाणबुडीच्या मध्यम दुरुस्ती तसेच आजीवन प्रमाणीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने माझगाव डॉक शिपबिल्डर्स सोबत 2725 कोटी रुपयांच्या करारावर केली स्वाक्षरी

Posted On: 30 JUN 2023 4:37PM by PIB Mumbai

 

सब-सरफेस किलर श्रेणीच्या 'आयएनएस शंकुश ' पाणबुडीची मध्यम स्वरूपाची दुरुस्ती तसेच आजीवन प्रमाणीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाने 30 जून 2023 रोजी मुंबई स्थित माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत एकूण 2725 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली.

शंकुश ही पाणबुडीची सब-सरफेस किलर श्रेणी असून मुंबईत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड  इथे तिची दुरुस्ती केली जाईल.  मध्यम स्वरूपाची दुरुस्ती तसेच आजीवन प्रमाणीकरणानंतर 2026 मध्ये पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आयएनएस शंकुश लढण्यासाठी सज्ज असेल आणि सुधारित लढाऊ क्षमतेसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होईल.

भारताच्या औद्योगिक व्यवस्थेच्या विकासासाठी पूरक म्हणून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) केंद्र  म्हणून विकसित करण्याच्या दिशेने, हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रकल्पामध्ये 30 पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कंपन्याही सहभागी होतील आणि प्रकल्प कालावधीसाठी दररोज 1200 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल.

केंद्र सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमाला अनुरूप हा प्रकल्प, आत्मनिर्भर भारत मोहिमेचा अभिमानास्पद ध्वजवाहक असेल.

***

R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936440) Visitor Counter : 123


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil