भारतीय स्पर्धा आयोग
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड कडून टीसीएनएस क्लोदिंग कंपनी लिमिटेडचे अधिग्रहण होण्यास सीसीआयची मंजूरी
Posted On:
27 JUN 2023 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2023
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड कंपनीकडून, टीसीएनएस क्लोदिंग कंपनी लिमिटेडचे अधिग्रहण होण्यास, सीसीआय म्हणजेच, भारतीय स्पर्धा आयोगाने मंजूरी दिली आहे.
ह्या व्यवहारात, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एक्वायरर) द्वारे अधिग्रहक, टीसीएनएस क्लोदिंग कंपनी लिमिटेडचे विस्तारित समभाग भांडवलाच्या 51% संपादन केले जाणार आहेत.
आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड ही एक सूचीबद्ध कंपनी आहे आणि ती आदित्य बिर्ला समूहाचा भाग आहे. ह्या कंपनीचे किरकोळ दुकाने ऑनलाइन किरकोळ प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स मार्केटप्लेस द्वारे वस्त्रप्रावरणे, पादत्राणे आणि इतर ब्रँडेड उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत.
तर लक्ष्यित टीसीएनएस क्लोदिंग कंपनी, महिलांची वस्त्रप्रावरणे, अलंकार,पादत्राणे आणि सौन्दर्यप्रसाधने, अशा वस्तूंचे उत्पादन आणि वितरण करणारी कंपनी आहे. त्यांचे डब्ल्यू, ऑरेलिया, विशफुल, इलेव्हन आणि फोक सॉन्ग असे विविध ब्रॅंड आहेत. ही कंपनी, उपरोक्त उत्पादनांच्या घाऊक रोख व्यवहाराच्या (फ्राँचायझी आउटलेटद्वारे विक्री सह) व्यवसायात देखील आहे.
सीसीआयचा सविस्तर आदेश लवकरच उपलब्ध होईल.
* * *
S.Kakade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1935716)
Visitor Counter : 169