संरक्षण मंत्रालय
आयएनएस त्रिशूल ची तोमासीना बंदराला भेट
Posted On:
24 JUN 2023 7:22PM by PIB Mumbai
सागरी शेजाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याच्या भारताच्या धोरणाला अनुसरून भारतीय नौदलाच्या आयएनएस त्रिशूल या युद्धनौकेने, मादागास्करच्या तोमासीना बंदराला भेट दिली. नवव्या आंतरराष्ट्रीय दिनाची, ‘ओशन रिंग ऑफ योगाच्या’ संकल्पनेनुसार तिथे योगदिनही साजरा करण्यात आला. यात, जहाज कंपनीतील 352 कर्मचारी, गव्हर्नर आणि मेयरच्या कार्यालयातील अधिकारी, मालागासे सशस्त्र दल, महिला पोलीस, भारतीय दूतावासाचे सदस्य (भारताच्या राजदूतासह), डॉक्टर, परिचारिका, भारतीय समुदायाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मादागास्करच्या अँटसिरानाना क्षेत्राचे गव्हर्नर रॅफिडिसन रिचर्ड थिओडोर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
जहाजाच्या भेटीदरम्यान, कमांडिंग ऑफिसरने मालागासे इथले मान्यवर आणि वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांची शिष्टाचार भेट घेतली. भारतीय आणि मालागासेच्या सशस्त्र दलातील कर्मचारी व्यावसायिकांमध्ये यावेळी चर्चा झाली. दोन्ही नौदलांमधील सहकार्य आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा या भेटीचा उद्देश होता.
त्याचदिवशी असलेल्या जागतिक संगीत दिनानिमित्त, द मेयर हॉल, तोमासीना येथे बँडवादनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये आयएन बँड आणि बेटसिमिसरका फोकलोरिक ग्रुप 'SAHY' यांनी मान्यवर आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत सादरीकरण केले आणि मनमोहक संगीत सादर केले. हे जहाज 21 जून 23 रोजी तोमासिना, मादागास्कर येथे अभ्यागतांसाठी खुले करण्यात आले होते आणि सुमारे 400 अभ्यागतांचे साक्षीदार होते.
भारतीय नौदलाच्या मैत्रीसेतू बांधण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या भारतीय नौदलाच्या अभियानाचा भाग म्हणून भारतीय नौदलाची जहाजे नियमितपणे परदेशात तैनात केली जातात.
INS त्रिशूल ही तलवार श्रेणीतील दुसरी युद्धनौका 25 जून 2003 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. या जहाजावर अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर पॅकेज आणि बहुपयोगी हेलिकॉप्टरही आहे.
INSTRISHULVISITTOPORTOFTOAMASINAW8S2.jpeg)
INSTRISHULVISITTOPORTOFTOAMASINAS5M0.jpeg)
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935064)