संरक्षण मंत्रालय

आयएनएस सुनयनाची केनियातील मोम्बासाला भेट

Posted On: 24 JUN 2023 6:03PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस सुनयनाने  20 ते 23 जून दरम्यान, केनियाच्या मोम्बासा इथे भेट दिली. ओशन रिंग ऑफ योगा या संकल्पनेवर आधारित आपल्या सागरी शेजाऱ्यांशी असलेले द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या दौऱ्यात, भारताच्या उच्चायुक्तालयाच्या प्रतिनिधीनी ह्या जहाजाचे स्वागत केले. भारतीय कमांडिंग ऑफिसरनी केनिया नौदलाचे डेप्युटी कमांडर, ब्रिगेडियर वाय. एस. अब्दी यांची  भेट घेतली आणि योगाचे महत्त्व आणि जग एकत्र आणण्यात योगाची भूमिका ठळकपणे मांडली. आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2023 रोजी, भारतीय नौदल आणि केनियाच्या संरक्षण दलाचे अधिकारी यांनी संयुक्त योगाभ्यास केला.

दोन्ही नौदलांदरम्यान सागरी भागीदारीचा सराव करण्यात आला. भारतीय आणि केनिया दोन्ही नौदलाच्या दलाने बंदर टप्प्यात अग्निशमन आणि नुकसान नियंत्रण, बोर्डिंग व्यायाम, काही धोका गृहीत धरून, त्यानुसार सिम्युलेशन आणि VBSS च्या कवायती केल्या.

केनियाचे संरक्षण दल प्रमुख (CDF) जनरल फ्रान्सिस ओगोला यांच्या सन्मानार्थ भारताचे नौदल उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय महिंद्रू यांनी सुनयना इथे स्वागत समारंभ आयोजित केला होता.

भारतीय नौदलाची सामाजिक कार्ये आणि समुदायाच्या कल्याणासाठीच्या कामांच्या अनुषंगाने, मोम्बासा इथल्या अनाथालयाला मदत देण्यात आली.

मोम्बासाहून निघताना, आयएनएस सुनयना ने 23 जून रोजी केनिया नौदल जहाज जसिरी सोबत PASSEX सराव  केला. मोम्बासाच्या भेटीमुळे भारत आणि केनिया यांच्यातील दीर्घकालीन संबंधांना बळकटी मिळाली तसेच दोन्ही देशातील नौदलांचे सागरी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणखी मजबूत होण्यास मदत झाली.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935043) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu