गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये बलिदान स्तंभाची  केली पायाभरणी तसेच जम्मू-काश्मीर पोलिस दलातील शहिदांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दिली नियुक्ती पत्र


जम्मू-काश्मीर ही देशातील शूर वीरांच्या अदम्य साहस आणि शौर्याची भूमी आहे, अशा वीरांचे शौर्य अजरामर व्हावे यासाठीच बलिदान स्तंभाची निर्मिती केली जात आहे - केंद्रीय गृहमंत्र्यांचा ट्विट संदेश

दहशतवाद्यांशी लढत निरपराध नागरिकांच्या रक्षणासाठी  आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जम्मू-काश्मीर पोलिसांच्या असंख्य जवानांचे हौतात्म्य हे काश्मीर आणि तेथील जनतेच्या शांततेप्रतीच्या  कटिबद्धतेचा दाखला  - केंद्रीय गृहमंत्री

Posted On: 24 JUN 2023 4:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांच्या दोन दिवसीय जम्मू आणि काश्मीर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, आज श्रीनगरमध्ये बलिदान स्तंभाची पायाभरणी केली. अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि त्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. जम्मू-काश्मीर ही देशातील शूर वीरांच्या अदम्य साहस आणि शौर्याची भूमी आहे, अशा वीरांचे शौर्य अजरामर व्हावे यासाठीच आज श्रीनगरमधील प्रताप पार्क येथे 'बलिदान स्तंभा'ची पायाभरणी करण्यात आली. हा स्तंभ हुतात्म्यांच्या स्मृती सदैव स्मरणात ठेवत  तरुणांना देशभक्तीची प्रेरणा देईल," असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.

दहशतवाद्यांशी लढत  निरपराध नागरिकांना सुरक्षित ठेवताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जम्मू-काश्मीर पोलिस दलातील असंख्य जवानांचे हौतात्म्य हे काश्मीर आणि तेथील लोकांच्या शांततेसाठीच्या  कटिबद्धतेचा दाखला आहे, असे शहा यांनी म्हटले आहे. "आज श्रीनगरमध्ये अशा शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या वतीने हुतात्म्यांच्या जवळच्या नातेवाईकांना नियुक्तीपत्रे दिली, असेही त्यांनी सांगितले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1935015) Visitor Counter : 142