वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

निर्यातदारांना दिलेल्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून इसीजीसी लिमिटेडची (ECGC Ltd) प्रशंसा


इसीजीसी लिमिटेड मधील सर्व प्रक्रिया पुढील काही महिन्यांत पूर्णपणे डिजिटल केल्या जातील आणि तक्रार निवारण यंत्रणा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राबवली जाईल: पीयूष गोयल

बँकिंग योजना करिता असलेला निर्यात हमी विमा 90% च्या अधिक वाढीव मोबदल्या सह 50 कोटी पर्यंत मर्यादा असलेल्या खात्यांना लागू होईल: पीयूष गोयल

Posted On: 23 JUN 2023 6:48PM by PIB Mumbai

 

निर्यातदारांना दिलेल्या समर्थन आणि प्रोत्साहनाबद्दल केंद्रीय वाणिज्य, उद्योग तसेच ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांनी इसीजीसी लिमिटेड (ECGC Ltd) अर्थात निर्यात पत हमी महामंडळाची (मर्यादित) प्रशंसा केली आहे. आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, मंत्री गोयल यांनी पारदर्शकता आणि प्रक्रिया सुलभ करण्याच्या गरजेवर भर दिला आणि सांगितले की एसीजीसी मर्यादित मधील सर्व प्रक्रिया येत्या काही महिन्यांत पूर्णपणे डिजिटल केल्या जातील. मंत्री म्हणाले की, इसीजीसी मधील प्रक्रियेचे डिजिटायझेशन झाल्याने निर्यातदारांची मोठी सोय होईल.  गोयल यांनी असेही सांगितले की, इसीजीसी मध्ये एक नवीन तक्रार निवारण यंत्रणा स्थापन केली जाईल ज्यामुळे इसीजीसी मर्यादित (ECGC Ltd) च्या संकेतस्थळावर दररोज एक तास थेट व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध होईल.

गेल्यावर्षी इसीजीसी मर्यादितने एक्सपोर्ट क्रेडिट इन्शुरन्स फॉर बँक्स (ECIB) योजनेसाठी देण्यात येणाऱ्या निर्यात पतविम्यात वाढ केली असून हा  90% पर्यंतचा वर्धित मोबदला बँकेकडून स्वीकृती मिळालेल्या 20 कोटी पर्यंतच्या निर्यात खेळते भांडवल असलेल्या खात्यांना मिळणार आहे(व्यापारी आणि GJD निर्यातदार वगळून). या वाढीव विमासुरक्षा मोबदल्याच्या वाटपासाठी आतापर्यंत एसबीआय(SBI),सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), बँक ऑफ महाराष्ट्र आणि सारस्वत बँक या चार बँकांची निवड केली आहे. या योजनेकरिता मागील एका वर्षातील थकबाकीदारांचे कमी प्रमाण पाहता  अनुभव समाधानकारक आहे. मंत्री पियुष गोयल म्हणाले की, या योजनेंतर्गत मिळत असलेल्या वाढीव सुरक्षेमुळे  बँकांकडून मिळणाऱ्या पत/कर्जावरील व्याजदर सुलभ झाले आहेत.

यावेळी गोयल यांनी घोषणा केली की, या वर्धित संरक्षणाचा लाभ  कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय वरील चार बँकांसाठी 50 कोटी रुपयापर्यंत मर्यादा असलेल्या खात्यांना दिला जाईल. यामुळे जवळपास 3000 निर्यातदार-कर्जदार खात्यांना  फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, इसीजीसी मर्यादित (ECGC Ltd.) ने 16,000 पेक्षा जास्त निर्यातदारांना 6.68 लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या एकूण मूल्यासह समर्थन दिले आहे. यावेळी निर्यात पतहमी महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  एम. सेंथिलनाथन यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात व्यवसाय संरक्षण मूल्य 10 लाख कोटी रुपयांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे.

***

R.Aghor/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934911) Visitor Counter : 91


Read this release in: English , Urdu , Hindi