वस्त्रोद्योग मंत्रालय
पीएम मित्र पार्क्समध्ये व्यवसाय सुरू करून ते विस्तारित करण्यासाठी उद्योग क्षेत्राने दाखवलेल्या उत्साहाबद्दल केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केली प्रशंसा
वस्त्रोद्योग उत्पादनासाठी अनुकूल परिसंस्था तयार केल्याबद्दल गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे गोयल यांनी केले कौतुक
Posted On:
21 JUN 2023 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2023
प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन अँड अपेरल (पीएम मित्र) पार्क्समध्ये व्यवसाय सुरू करून ते विस्तारित करण्यासाठी उद्योग क्षेत्राने दाखवलेल्या उत्साहाचे केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक केले आहे. ‘पीएम मित्र योजनेअंतर्गत वस्त्रोद्योगातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते काल नवी दिल्ली येथे बोलत होते. या क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी संशोधन आणि विकास त्याचबरोबर नवोपक्रमासाठी सहकार्य आणि भागीदारी करण्याचे आवाहन त्यांनी उद्योगांना केले.
कापड उत्पादनासाठी सक्षम परिसंस्था तयार करण्यासाठी गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 7 राज्य सरकारांनी राबवलेल्या अनुकरणीय उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विद्यमान आकर्षक योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. या योजनांमध्ये राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवण्याची योजना (समर्थ) यांचा समावेश आहे.
वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना उत्पादन केंद्र तयार करणे किंवा ते विस्तारित करणे यासाठी मदत करण्याकरिता वस्त्रोद्योग मंत्रालयामध्ये एक समर्पित इन्व्हेस्ट इंडिया डेस्क स्थापन करण्याची सूचना गोयल यांनी केली.
* * *
N.Chitale/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934292)
Visitor Counter : 124