संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 साजरा करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने योग प्रात्यक्षिकांमधून देशाच्या किनारपट्टीवर साकारली सागरमाला

Posted On: 21 JUN 2023 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023

 

भारतीय तटरक्षक दलाने 21 जून 2023 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त  भारतीय तटरक्षक दलाने गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगाल या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये तसेच अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांवर तटरक्षक दलाचे  सर्व तळ, जहाजे आणि केंद्रांवर विशेष योग सत्र आयोजित करत  देशाच्या संपूर्ण किनारपट्टी प्रदेशात कोस्टल रिंग/सागरमाला साकारली.  

भारतीय द्वीपकल्पाच्या कच्छ (गुजरात) पासून, ते कोलकाता (पश्चिम बंगाल) पर्यंत साकारण्यात आलेली कोस्टल रिंग, ‘ओशन रिंग ऑफ योग’, या यंदाच्या संकल्पनेवर आधारित होती, तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या योग साधनेमधील निर्मळ सहभागाचे प्रतिक होती. अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर आणि गांधीनगर आणि दिल्ली या तळावर केलेल्या योग प्रात्यक्षिके म्हणजे सागरमालेमधील हिरा भासले.  

राजधानी दिल्ली येथे योग दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात तटरक्षक दलाचे 500 पेक्षा जास्त कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यामधून देशाच्या विस्तीर्ण किनारपट्टीचे रक्षण करण्याबरोबरच  आरोग्यमय आणि समतोल जीवनशैली देखील जोपासण्याची त्यांची  वचनबद्धता प्रदर्शित झाली.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 निमित्त, भारतीय तटरक्षक दलाने देशभर विविध सत्रांचे आयोजन करून या दिवसाचे महत्व अधोरेखित केले. भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचार्‍यांच्या दिनचर्येमध्ये योग साधनेचा समावेश केल्यामुळे, त्यांना आपली शारीरिक आणि क्षमता वाढवण्यासाठी, तसेच ताणतणावाचे व्यवस्थापन आणि मानसिक सामर्थ्य वाढवण्यासाठी मदत झाली आहे. योगाभ्यासामुळे तटरक्षक दलाच्या जवानांना आपल्या कामगिरीची उच्च पातळी राखता आली आहे तसेच, समुद्रामधील आव्हानात्मक परिस्थितीतही मन स्थिर राखण्यामध्ये मदत झाली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 मधील भारतीय तटरक्षक दलाच्या सहभागाने, सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठीची त्यांची वचनबद्धता प्रदर्शित झाली.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1934233) Visitor Counter : 109
Read this release in: English , Urdu , Hindi