रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Posted On:
21 JUN 2023 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे धंतोलीच्या यशवंत स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
गडकरी यांनी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण आज ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेने योग दिन साजरा करत आहोत. गेल्या काही वर्षांपासून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा"

* * *
S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1934205)
Visitor Counter : 126