मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांची कॅनडाच्या कृषी आणि कृषी-खाद्यान्न मंत्री मेरी-क्लौड बिबाऊ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक
भारत आणि कॅनडा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी बळकट करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2023 7:08PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्सोद्योग, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री परषोत्तम रुपाला यांनी कॅनडाच्या कृषी आणि कृषी-खाद्यान्न मंत्री मेरी-क्लौड बिबाऊ यांच्यासोबत आज द्विपक्षीय बैठक घेतली.
पशुधनाची आरोग्य व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करणे, पशुंचे जनुकीय अद्ययावतीकरण, जैवसुरक्षितता विषयक उपाययोजना, क्षमता निर्मिती इत्यादी बाबतीत द्विपक्षीय सहकार्याच्या शक्यतांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.पशुपालन संबंधित क्षेत्रांमध्ये एकमेकांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत यावर दोन्ही देशांच्या नेत्यांचे एकमत झाले.
माहितीची आणि विशेष ज्ञानाची देवाणघेवाण केल्यामुळे पशुपालन क्षेत्रातील एकमेकांचे ज्ञान आणि क्षमता वाढवण्यात मदत होईल आणि त्यातून दोन्ही देशांना परस्पर फायदा होईल.
दोन्ही नेत्यांनी या बैठकीत भारत आणि कॅनडा यांच्यातील दृढ आणि वैशिष्ट्यपूर्ण मैत्री आणखी बळकट करण्यासंदर्भातील विविध संकल्पनांची चर्चा केली.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933785)
आगंतुक पटल : 150