श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एप्रिल 2023 मध्ये 17.20 लाख नवे सदस्य जोडले
Posted On:
20 JUN 2023 6:10PM by PIB Mumbai
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 20 जून 2023 रोजी जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीत अनेक महत्त्वाच्या मापदंडामधे लक्षणीय वाढ दिसून येत आहे. ईपीएफओमध्ये एप्रिल, 2023 मध्ये 17.20 लाख नव्या सदस्यांची भर झाली आहे. या तुलनेत आधीच्या महिन्यात म्हणजे मार्च 2023 मध्ये 13.40 लाख नव्या सदस्यांची भर पडली होती.
महिन्याभरात जोडल्या गेलेल्या 17.20 लाख सदस्यांपैकी सुमारे 8.47 लाख नवीन सदस्य प्रथमच ईपीएफओ च्या सामाजिक सुरक्षेअंतर्गत आले आहेत. नव्याने सामील झालेल्या सदस्यांमध्ये, 18-25 वयोगटातील सदस्य हे या महिन्यादरम्यान जोडल्या गेलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या 54.15% आहेत. 18-25 वयोगटावरून असे दिसून येते की देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचारी वर्गात सामील होणारे बहुतांश सदस्य हे प्रथमच नोकरी करणारे आहेत.
पुन्हा-जोडल्या गेलेल्यांची वाढणारी संख्या ही आकडेवारी दर्शवते. कारण, मार्च 2023 च्या मागील महिन्यात 10.09 लाख सदस्यांच्या तुलनेत 12.50 लाख सदस्य बाहेर पडले परंतु ते ईपीएफओ मध्ये पुन्हा सामील झाले. या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या आणि ईपीएफओ अंतर्गत समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा सामील झाले तसेच नोकरी सोडताना सदस्यत्वापोटी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढून घेण्याऐवजी ती हस्तांतरित करण्याचा पर्याय त्यांनी निवडला, यामुळे त्यांची सामाजिक सुरक्षाही अधिक बळकट झाली आहे.
लिंगनिहाय वेतनपट आकडेवारीनुसार मार्च, 2023 मधील 2.57 लाखांच्या तुलनेत एप्रिल, 2023 मध्ये 3.48 लाख महिला सदस्यांची नोंदणी झाली आहे. या महिन्यात जोडल्या गेलेल्या एकूण 8.47 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.25 लाख नवीन महिला सदस्य प्रथमच ईपीएफओ मध्ये सामील होत आहेत. या महिन्यातील सर्व नवीन नोंदणीपैकी सुमारे 26.61% महिला सदस्य आहेत. नवीन सदस्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत महिलांचा सर्वाधिक सहभाग असल्याचे यातून दिसून येते.
वेतनपटाच्या देशव्यापी विश्लेषणावरुन असे दिसून येते की बहुतांश राज्यांमधे नव्या सदस्यांची दर महिन्याला पडणारी भर वाढीचा कल दर्शवते. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, दिल्ली या राज्यांचे या महिन्यातील नव्या सदस्य वाढीमध्ये 59.20% योगदान आहे.
कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे माहिती/आकडेवारी तयार करणे ही सातत्याने चालणारी प्रक्रीया आहे. परिणामी वरील आकडेवारी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. मागील आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि इतर तरतुदी कायदा, 1952 च्या कक्षेत समाविष्ट असलेल्या देशातील संघटित कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा निधीच्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा लाभ देण्यासाठी ईपीएफओ वचनबद्ध आहे.
***
N.Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1933777)
Visitor Counter : 154