ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

मानके गुणवत्तेची सर्वोच्च पातळी निश्चित करतात, आणि ग्राहकांसाठी उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करतात: भारतीय मानक संस्थेचे (बीआयएस) महासंचालक प्रमोद कुमार तिवारी


पादत्राणांच्या 24 उत्पादनांना 1 जुलै 2023 पासून बीआयएस परवाना बंधनकारक

Posted On: 19 JUN 2023 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2023

 

मानके गुणवत्तेची सर्वोच्च पातळी निश्चित करतात आणि त्यामुळे सर्व ग्राहकांसाठी उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित होते, असे भारतीय मानक संस्थेचे (बीआयएस) महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली मध्ये प्रसारमाध्यमांना संबोधित करताना बोलत होते. भारत सरकारने पादत्राणे आणि इतर उत्पादनांसाठी नुकत्याच जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे (क्यूसीओ) महत्त्व तिवारी यांनी यावेळी अधोरेखित केले.

ते म्हणाले की, 1 जुलै 2023 पासून चामडे आणि इतर पदार्थांपासून बनवलेल्या, तसेच सर्व पॉलिमेरिक आणि सर्व रबर युक्त पदार्थांपासून बनवलेल्या पादत्राणांच्या श्रेणींमधील 24 पादत्राणे उत्पादनांसाठी क्यूसीओ लागू केले जाईल, आणि त्यानंतर, या क्यूसीओ अंतर्गत उत्पादनांचे उत्पादन, आयात किंवा विक्री करण्यासाठी बीआयएस परवाना बंधनकारक असेल. मात्र, नुकत्याच सुधारणा केलेल्या 5 मानकांसाठी, उत्पादकांना, सुधारित वैशिष्ट्यांची पूर्तता  करण्यासाठी, 1 जानेवारी 2024 पर्यंत सहा महिन्यांचा वाढीव कालावधी देण्यात येईल.

बीआयएसच्या उपक्रमांची माहिती देताना तिवारी यांनी सांगितले की, बीआयएस ने स्टँडर्ड्स क्लब, अर्थात मानक गटाचे मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांना माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी, नुकतेच ‘मानक रथ’ नावाचे एक ऑनलाइन व्यासपीठ सुरु  केले आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ‘मानक रथ’चा उपयोग स्टँडर्ड्स क्लबच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि दर्जेदार विषयांवर प्रश्नमंजुषा, मानक लेखन आणि इतर स्पर्धा आयोजित करण्यासाठी केला जाईल, असे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933527) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi