नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

म्युनिच इथे झालेल्या ‘इंटर सोलर युरोप, 2023’ ह्या  प्रदर्शनात इरडाचा (IREDA)सहभाग;  शाश्वत भविष्यासाठी ऊर्जा संक्रमणाच्या मोहिमेत जागतिक हितसंबंधियांशी चर्चा

Posted On: 18 JUN 2023 7:57PM by PIB Mumbai

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीइरेडा (IREDA) ने जर्मनीतील म्युनिच इथे झालेल्या इंटरसोलर युरोप 2023’ ह्या  तीन दिवसीय प्रदर्शनात  सहभाग घेतला. 14 ते 16 जून 2023 ह्या काळात हे प्रदर्शन झाले.केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, इरडा ही मिनी रत्न श्रेणीतील, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना असून , ह्या प्रदर्शनात त्यांनी एक पॅव्हेलियन स्थापन करुन आपल्या संघटनेबद्दल, प्रदर्शनात येणाऱ्या लोकांना माहिती दिली अक्षय ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे, ऊर्जा क्षमतेला प्रोत्साहन देणे आणि भारतात अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या वृद्धीला पाठबळ देणे, अशा कामात इरडाच्या भूमिकेची माहिती प्रदर्शनाला येणाऱ्या लोकांना झाली. इरडाचे नेटवर्क वाढवणे आणि इरडासोबत व्यवसायाच्या संभाव्य संधी शोधण्यासाठी देखील हे  पॅव्हेलियन  एक मंच म्हणून उपयुक्त ठरले. विशेषतः आज जेव्हा ऊर्जा संक्रमणासाठीचा महत्वाचा काळ असून इरडा इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ काढण्याच्या विचारात असतांना, ह्या प्रदर्शनातला सहभाग विशेष महत्वाचा ठरला.

इरडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, प्रदीप कुमार दास यांच्या हस्ते ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलतांना ते म्हणाले, इंटरसोलर युरोप मुळे इरडा ला आपल्या उपलब्धी आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वित्तपुरवठ्याचा अनुभव दाखवण्याची संधी मिळते आहे. ह्या प्रतिष्ठित प्रदर्शनाचा भाग झाल्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत. यामुळे आम्हाला जागतिक स्तरावरील भागीदारांशी चर्चा करण्याची आणि त्याद्वारे एकत्रित काम करण्याच्या, एकमेकांच्या कल्पनांची देवघेव करण्याची आणि ऊर्जा संक्रमणाच्या मोहिमेला गती देत, अधिक हरित आणि शाश्वत भविष्यकडे वाटचाल करण्याचीही संधी मिळाली.

A group of people sitting on a couchDescription automatically generated

इंटरसोलर युरोप 2023 मध्ये इरडाचा सहभाग, जागतिक अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात, सहभाग देण्याची या कंपनीची कटिबद्धता आणि शाश्वत विकासाच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याची मानसिकता दिसून आली. ह्या सहकार्याच्या प्रयत्नातून तसेच, अभिनव उपाययोजना करत, भारताच्या अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यात आणि हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यात, इरडा आपले महत्वाचे योगदान देतच राहणार आहे.

A group of people standing in a roomDescription automatically generated with medium confidence

***

S.Kane/R.Aghor/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1933323) Visitor Counter : 105


Read this release in: English , Urdu , Hindi