ऊर्जा मंत्रालय

केरळची जलविद्युत क्षमता वाढवण्यासाठी एनएचपीसी पुरवणार केरळ राज्य वीज मंडळाला सल्लागार सेवा

Posted On: 17 JUN 2023 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

एनएचपीसी मर्यादित आणि केरळ राज्य वीज मंडळ मर्यादित यांच्यात सामंजस्य करारावर झाला आहे. या अंतर्गत एनएचपीसी मर्यादित तर्फे, केरळ राज्य वीज मंडळाच्या चालू प्रकल्पांच्या तसेच प्रस्तावित प्रकल्पांच्या संरचनेची पडताळणी करण्यासाठी सल्लागार सेवा प्रदान केली जाणार आहे. या सामंजस्य करारांतर्गत, केरळ राज्याची जलविद्युत क्षमता जलद विकसित करण्यासाठी, तांत्रिक - व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य पद्धतीने, स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने एक सक्षमक म्हणून एनएचपीसी मर्यादित आणि केरळ राज्य वीज मंडळ मर्यादित यांनी हातमिळवणी केली आहे.

एनएचपीसी मर्यादितचे कार्यकारी संचालक (स्ट्रॅटेजी बिझनेस डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी) रजत गुप्ता आणि केरळ राज्य वीज मंडळ मर्यादित चे संचालक (जनरेशन - सिव्हिल) राधाकृष्णन जी यांनी 16 जून 2023 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना एनएचपीसी मर्यादितचे कार्यकारी संचालक (SBD&C), आणि केरळ राज्य वीज मंडळ मर्यादित चे संचालक (जनरेशन - सिव्हिल)

या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी केरळ राज्य वीज मंडळ मर्यादित चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत एक संक्षिप्त बैठकही झाली. केरळ राज्य वीज मंडळ मर्यादित बरोबर काम करत असल्याबद्दल, मंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. विष्णोई यांचे आभार मानले आणि एनएचपीसीच्या तांत्रिक कौशल्याप्रती आणि तज्ञ कर्मचाऱ्यांप्रती दृढ विश्वास  व्यक्त केला.

 

* * *

M.Pange/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933098) Visitor Counter : 93


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu